उच्च प्रतिच्या फिचर्सचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ब्रिटीश कार कंपनी एमजी मोटार इंडिया यांनी आपल्या नव्या स्मार्ट इलेक्ट्रिक कारचे नाव उघड केले आहे. कंपनीच्या या ईव्हीचे नाव ‘कॉमेट’ असे राहणार आहे. एमजीने कारच्या डिझाईन आणि फिचर्सबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. एमजीने आगामी स्मार्ट ईव्ही नावाची घोषणा केली आहे.
ही कार इंडोनेशियात वुलिंग एअर ईव्ही या नावाने सादर करण्यात आली आहे. सदरच्या कारमध्ये टचस्क्रीन, डिजिटल कन्सोल, कनेक्ट कार टेक्नॉलॉजी व अनेक उच्च प्रतीच्या फिचर्सची सुविधा उपलब्ध होणार आहे. भारतीय ग्राहकांसाठी कंपनीने आपल्या डिझाईनमध्ये काही बदल करणार असल्याचे म्हटले आहे.