नवी दिल्ली
वाहन कंपन्यांनी नुकतीच जून महिन्यांतील आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱया बजाज ऑटोसाठी विक्री मागील महिन्यात जून 2021 सारखी राहिली आहे. दुसऱया बाजूला एमजी मोटारला मागील महिन्यात 27 टक्क्यांची तेजी मिळाली. यातील काही निवडक कंपन्यांची जूनमधील कामगिरी खालीलप्रमाणेö
बजाज ऑटोची देशातील विक्री घसरली
मागील महिन्यात बजाज ऑटोची विक्री जून 2021 सारखीच राहिली आहे. कंपनीने मागील वर्षातील जूनमध्ये 3,46,136 युनिट्ची विक्री केली होती. जी मागील महिन्यात 3,47,004 युनिटची नेंद आहे. तर जूनमध्ये देशातील विक्रीचा टक्का हा 15 टक्क्यांनी घसरत 1,38,351 युनिटवर राहिला आहे. यामध्ये कंपनीने जूनमध्ये निर्यातीसह एकूण 3,15,948 वाहनांची विक्री केली असल्याची नोंद आहे. एकंदर जूनमध्ये विक्री कमी झाली.
सहा महिन्यात दिल्लीत 25 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री
दरम्यान इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा विचार करता दिल्लीत पहिल्या 6 महिन्यात 25 हजार 890 वाहने विक्री झाली आहेत. एकंदर वाहन विक्रीत दिल्लीने 9.3 टक्के इतका वाटा उचलला आहे. वरीलप्रमाणे पाहता दिल्लीत दरदिवशी 143 सरासरी वाहनांची नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. मागच्या दरदिवशी 71 वाहनांच्या तुलनेत ही विक्री जास्तच आहे.
प्रवासी वाहनांच्या विक्रीत 40 टक्के वाढ
दुसरीकडे देशातील प्रवासी अर्थात पॅसेंजर वाहनांच्या विक्रीने जूनमध्ये दमदार कामगिरी नोंदवली आहे. जवळपास 40 टक्के इतकी वाढ विक्रीत दर्शवली असल्याची माहिती फाडा या संघटनेने दिली आहे. दरम्यानच्या काळात सेमीकंडक्टर चिप्सच्या पुरवठय़ात सातत्य परतल्याने कंपन्यांनी निर्मिती कार्यालाही वेग दिला आहे.एमजी मोटार इंडियाची विक्री 27 टक्क्यांनी तेजीत एमजी मोटार इंडियाची किरकोळ विक्री 27 टक्क्यांनी वाढून 4,503 युनिटवर राहिली आहे. जी मागील वर्षातील समान महिन्याच्या दरम्यान किरकोळ आकडा 3,558 युनिटवर राहिला होता. वाहन निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक असणाऱया चिपची उपलब्धता चांगल्याप्रकारे झाल्याने याचा फायदा कंपन्यांना उठवता आला. जूनमध्ये हेक्टरच्या 4,000 आणि इलेक्ट्रिक एसयूव्ही जेडएस ईव्हीच्या 1,000 गाडय़ांचे बुकिंग झाले आहे.