बेळगाव: बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे शिवारात रताळी पिकावर औषध फवारणी करीत असताना विद्युतभारित तार अंगावर तुटून पडल्यामुळे शेतकरी दांपत्य जागीच ठार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आपली मुलगी व जावई यांच्या आकस्मित निधनाने शोकाकुल आई चंद्रमाला देसाई यांना लक्ष्मीताई फौंडेशनच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यात आले. मृत दाम्पत्याला अवघे २ वर्षाचे बाळाला पाहून मंत्री हेब्बाळकर भावुक झाल्या. सरकारकडून योग्य परिहार मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी कुटुंबियांना दिले. या प्रसंगी प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल निरीक्षक, ग्राम लेखाधिकारी व इतर उपस्थित होते.