Sangli Crime : सांगलीतील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिरजेतील एका तरुणा विरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पीडित तरुणी ही सांगलीतील असून प्रसाद मोतुगडे माळी(वय-20) राहणार ब्राह्मणपुरी मिरज असे तरुणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,
प्रसाद माळी या तरुणाने सदरच्या पीडित मुलीचे सुरुवातीला अपहरण केलं.मिरजेत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ज्यावेळी तिने आरडा-ओरडा सुरु केला. त्यावेळ तिची उजव्या हाताची नस कापल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.याचबरोबर गळ्यावर कटरने वार करून रक्ताच्य़ा थारोळ्यात सोडून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्य़ात आले असून तिला 17 टाके पडले आहेत. तिची प्रकृती आता स्थिर आहे. गांज्याच्या नशेत तरूणाने हे कृत्य केल्य़ाचा अंदाज वर्तवला जात आहे. याच्या विरोधात अपहरण पोक्सो ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करीत आहेत.