वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
18 एप्रिलपासून सुरू होणाऱया वरिष्ठ महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तसेच कसोटी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज रेल्वेचे संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर मिताली राजची ही पहिलीच स्पर्धा राहिल. भारतीय महिला क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. रेल्वे महिला संघामध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी या अनुभवी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. झुलन गोस्वामी सध्या पूर्ण तंदुरुस्त नसल्याने ती या स्पर्धेत सहभागी होणार नाही. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय महिला टी-20 स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱया रेल्वे संघाचे नेतृत्व मिताली राजने केले होते. दरम्यान 2019 अखेरीस मिताली राज टी-20 या क्रिकेटच्या प्रकारातून निवृत्त झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याबाबत तिने अद्याप निर्णय घेतलेला नाही, यासाठी भरपूर वेळ आहे. येत्या सप्टेंबरमध्ये भारताची तीन सामन्यांची टी-20 व वनडे मालिका इंग्लंडविरुद्ध होणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमध्येच ही मालिका होणार आहे.