रत्नागिरीतील माळनाका परिसरातील घटना, अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसावर शनिवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल़ा ही घटना माळनाका ते थिबा पॅलेस दरम्यान घडल़ी सुमित सावंत असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आह़े हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सावंत यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े साळवी यांच्या सुरक्षा रक्षकावर झालेल्या हल्याने शहर परिसरात खळबळ उडाली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार राजन साळवी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेले सावंत हे शनिवारी रात्री माळनाका ते थिबा पॅलेस दरम्यान जात होत़े यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल़ा सावंत यांना जबर मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे येत आहे. रात्रीच्यावेळी हा प्रकार घडल्याने हल्लेखोर नेमके कोण होते याची माहिती सध्या मिळवणे कठीण बनले आहे. साळवी यांचे सुरक्षा रक्षक सावंत यांना गंभीर जखमी अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नेंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आह़े त्यानुसार पोलिसांकडून जेलनाका ते माळनाका व थिबापॅलेस दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. मागील काही दिवसांपासून राजन साळवी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीमुळे चर्चेत आहेत़ दरम्यान हा हल्ला नेमका कशामुळे व कोणी केला याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े
वाय दर्जाच्या सुरक्षेतील पोलिसावर हल्ल्याने खळबळ
राजापुरातील प्रस्तावित बारसु रिफायनरी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे राजन साळवी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होत़ी त्यानुसार वाय दर्जाची सुरक्षा आमदार राजन साळवी यांना देण्यात आली आह़े वाय दर्जाची सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आह़े