एएमयूच्या प्राध्यापकाची महत्त्वाच्या पदावर निवड
वृत्तसंस्था/ अलीगड
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक मोहम्मद रिहान यांना नवीन आणि नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय सौरऊर्जा संस्थेत महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रिहान हे तीन वर्षापर्यंत या पदावर असणार आहेत. महासंचालक पदावर त्यांची नियुक्ती विषय तज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका निवड समितीकडून मुलाखती व भारत सरकारच्या कॅबिनेटच्या नियुक्ती समितीकडून मंजुरी मिळाल्यावर झाली आहे.
प्राध्यापक रिहान यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात मोठा अनुभव असून त्यांनी स्मार्ट ग्रिड आणि सौरऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. विद्यापीठातील स्वत:च्या कार्यकाळादरम्यान प्राध्यापक रिहान यांनी कॅम्पस वितरण ग्रिडमध्ये 6.5 सौर पीव्ही संयंत्रांच्या एकीकरणाचे नेतृत्व केले. देशाच्या कुठल्याही शैक्षणिक संस्थेत सर्वात मोठ्या स्थापनेपैकी हे एक आहे.
राष्ट्रीय सौरऊर्जा संस्था म्हणजेच नाइस सौरऊर्जेच्या क्षेत्रात केंद्रीत संशोधन आणि विकास संस्था आहे. याची स्थापना 2013 साली होती. अक्षय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकारच्या अधीन स्वायत्त संस्था अशी तिची ओळख असून मुख्यालय गुरुग्राम येथे आहे.