वार्ताहर /झुआरीनगर
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त कुठ्ठाळी भाजपा युवा मोर्चातर्फे मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सांकवाळचे पंच गिरीष पिल्ले, माजी पंच रमाकांत बोरकर, कुठ्ठाळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष नारायण नाईक, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश पडवळकर, उपाध्यक्ष अरूण गावस, महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा पेडणेकर, माजी पंच आरीष कादर, गोविंद लमाणी व इतर कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
उपासनगरातील गृहनिर्माण वसाहतीतून या रॅलीला सुरवात करण्यात आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय घोषणा देत रॅली झुआरीनगरमार्गे एम.ई.एस. महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली. देशप्रेमामुळेच युवावर्ग या रॅलीत मोठय़ा संख्येने उपस्थित राहिला.