ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी नागपूरहून विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलविण्यात आल्याची माहिती धानोरकर यांच्या आप्तेष्टांनी दिली.
बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे काल निधन झालं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजच त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर चंद्रपूरमधील भद्रावती या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकृती ठिक नसल्याने वडिलांच्या अंत्यविधीलाही हे उपस्थित राहू शकले नव्हते. आज दुपारी खा. धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या आतडय़ात इन्फेक्शन झाले असून, त्यांना नागपुरातून विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला नेण्यात आले आहे.