खासदार हरवले आहेत अशा प्रकारचे होर्डींग मतदार संघात झळकल्यानंतर चर्चेत आलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, आता पुन्हा नव्या कारणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. गेल्या ५ वर्षात आपण केलेल्या विकासकामांची आणि मतदारसंघात आणलेला निधीच्य़ा संदर्भात माहिती देणारे होर्डिंग मतदार संघात लावले आहेत. मात्र या होर्डिंगवर देण्यात आलेला क्यूआर कोडमध्ये विकासकांच्या माहिती ऐवजी बिटकॉइन संदर्भातील वेबसाईट उघडत असल्याचे उघड झाले आहे. या क्युआर स्कॅन करतानाचा प्रात्यक्षिक केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून यामुळे त्यामुळे खासदार धैर्यशील माने चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत.
2024 ची लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुक आणि विद्यमान खासदार यांच्याकडून कडून डिजीटल वॉर सुरु आहे. जो तो उमेदवार आपापल्या मतदारसंघात आपण केलेल्या कामांची पोस्टर झळकावत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर काही ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पाच वर्षापासून हातकणंगलेचे खासदार आम्हाला दिसलेच नसून खासदार हरवले असल्याचा मजकूराचे बॅनर हातकणंगले मतदारसंघात लावण्यात आले होते. त्यामुळे खासदार धैर्यशील माने हे चर्चेत आले होते.
आपल्या विकासकामांची माहीती देण्यासाठी पोस्टर लावण्यात आलेल्या या बॅनरवर जवळपास 8 हजार 200 कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा खासदार धैर्यशील माने यांनी केला आहे. मात्र, आता लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर धैर्यशील माने यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या माहीतीचे डिजीटल लावले असून या डिजीटलवर देण्यात आलेला क्युआर कोड फेक असल्याचे निदर्शनास आले आहे.
या डिजीटल बोर्डवर धैर्यशील माने यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेमधून हा निधी आणल्याचा दावा केला आहे. तसचे आपल्या विकास कामाची माहीती मिळण्यासाठी डिजीटल तंत्राचा वापर करताना क्युआर कोड दिला असून त्याद्वारे माहीती नागरीकांना मिळण्याची सोय त्यांनी केली आहे.
मात्र हाच क्यूआर कोड जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरला असून मतदारसंघातील नागरीकांना हा कोड स्कॅन केल्यानंतर बिटकॉइन आणि अनेक शेअर मार्केटची वेबसाईट ओपन होत असल्याचं निदर्शनास आले आहे. नागरिकांना हा व्हिडीयो सोशल मीडियामध्ये शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. सायबर क्राईम च्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच चुकीच्या क्युआर कोडमुळे वेबसाईट ओपन झाल्याने अनेकांना अर्थिक फटका बसला आहे. त्यातच खासदारांच्या बॅनरवर अशा प्रकारचा फेक क्यू आर कोड धैर्यशील माने ट्रोल होऊ लागले आहेत.