व्ही. बी. किरण, राजेश कोटीयान उपविजेते : रुषभ वशिष्ठ उत्कृष्ट पोझर
बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व रॉ फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने मि. रॉ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. रॉ हा मानाचा किताब पटकाविला. बेळगावच्या व्ही. बी. किरणने पहिले उपविजेतेपद तर उडपीच्या राजेश कोटीयाल याने दुसरे उपविजेतेपद मिळविले. तर रायचूरच्या रुषभ वशिष्ठला उत्कृष्ट पोझरने गौरविण्यात आले.
धर्मवीर संभाजी मैदान महाद्वार रोड येथे आयोजित केलेल्या रॉ फिटनेस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष जे. निळकंठ, गिरीष धोंगडी, अजित सिद्धन्नावर, अभय चौगुले, जे. डी. भट्ट, एम. गंगाधर, अजय चौगुले आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 100 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी संपूर्ण राज्यातून सहभाग घेतला होता. आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार आठ वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. सविस्त निकाल पुढीलप्रमाणे. 55 किलो गट – 1) आकाश निंगराणी बेळगाव 2) शशिधर उडपी 3) मंदार देसाई बेळगाव 4) रोहण अल्लूर बेळगाव 5) नारायण जोशिलकर बेळगाव. 60 किलो गट – 1) निर्मलकुमार शेट्टर धारवाड 2) मंथण धामणेकर बेळगाव 3) सेजल बादशाह दावणगिरी 4) शिव पाटील बेळगाव 5) दर्शन जी. चित्रदुर्ग. 65 किलो गट – 1) रुषभ वशिष्ठ रायचूर 2) मेहबूब बादशाह बेल्लारी 3) सोमशेखर कारवी उडपी 4) उमेश गंगणे बेळगाव 5) वाशिम ए. धारवाड. 70 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव 2) अर्शफ मंगळूर 3) सागर हदिमणी 4) राजू चौधरी धारवाड 5) साहेबलाल विजापूर. 75 किलो गट – 1) महेश गवळी बेळगाव 2) अफ्रोज ताशिलदार बेळगाव 3) श्रवणन एच बेंगळूर 4) गिरिष मायगेरी धारवाड 5) विजय पाटील बेळगाव. 80 किलो गट – 1) राजेश कोटीयान उडपी 2) तापसकुमार नायर चित्रदुर्ग 3) दयानंद निलजकर बेळगाव 4) प्रविण कणबरकर बेळगाव 5) सुनिल बागलकोटी बेळगाव. 85 किलो गट – 1) व्ही. बी. किरण बेळगाव 2) नित्यानंद कोटीयाल उडपी 3) किशन मंगळूर 4) श्रीवर्धन रे•ाr धारवाड 5) गजानन काकतीकर बेळगाव. 85 किलो वरील गट – 1) विकास सूर्यवंशी बेळगाव 2) महम्मद साकिब बी. बेळगाव 3) करामत ए. बेळगाव यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर मि. रॉ क्लासिक किताबासाठी आकाश लिंगराणी, निर्मलकुमार शेट्टर, रुषभ वशिष्ठ, प्रताप कालकुंद्रीकर, महेश गवळी, राजेश कोटीयान, व्ही. बी. किरण, विकास सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. विकास सूर्यवंशी, व्ही. बी. किरण व राजेश कोटीयान यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये बेळगावच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. रॉ. क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. बेळगावच्या व्ही. बी. किरणने पहिले उपविजेतेपद, राजेश कोटीयानने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे अभय चौगुले, सुहास सायबन्नावर, आनंद हंगिरगेकर, गिरिष धोंगडी, विजय चौगुले, केजल चौगुले, शिवाजी माने यांच्या हस्ते विजेत्या विकास सूर्यवंशीला मानाचा किताब, आकर्षक चषक, 21 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व भेटवस्तू तर पहिल्या उपविजेत्या व्ही. बी. किरणला चषक, 11 हजार रुपये, रोख प्रमाणपत्र व भेटवस्तू तर दुसऱ्या उपविजेत्या राजेश कोटीयानला चषक, 7 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट पोझरचा किताब रायचूरचा रुषभ वशिष्ठला 3 हजार रुपय रोख, चषक व मानाचा किताब देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून अजित सिद्धन्नावर, जे. निळकंठ, जे. डी. भट्ट, एम. के. गुरव, एम. गंगाधर, हेमंत हावळ, उमा महेश, सुनिल पोवार, नूर मुल्ला, प्रशांत सुगंधी, अनंत लंगरकांडे, नलवडे, सुनिल अष्टेकर यांनी काम पाहिले.