वेर्ले शाळा नं २ ची विद्यार्थिनी
ओटवणे प्रतिनिधी
वेर्ले शाळा नंबर २ मधील विद्यार्थिनी कु. कनिष्का आत्माराम जळवी हिची सन २०२३-२४ करिता नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे.दुर्गम ग्रामीण भागातील वेर्ले शाळा नंबर २ ही सावंतवाडी तालुक्यातील पहिली आय. एस. ओ मानांकन प्राप्त शाळा आहे. याच शाळेतील कु कनिष्का जळवी हिची नवोदय विद्यालयात निवड झाल्याने या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या निवडीबद्दल कु कनिष्का जळवी तिचे मार्गदर्शक तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री आत्माराम जळवी, उपशिक्षिका सौ कल्पिता जळवी यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुरेश नामदेव गावडे. पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, सर्व पालक आणि वेर्ले ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.