स्पाय वेबसीरिज 11 नोव्हेंबरला होणार स्ट्रीम
ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 ची आगामी स्पाय थ्रिलर वेबसीरिज ‘मुखबिर द स्टोरी ऑफ द स्पाय’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही सीरिज पाकिस्तानातील भारताच्या एका हस्तकाची कहाणी दर्शविणारी आहे. देशाच्या शत्रूकडून सुरू करण्यात आलेल्या छुप्या युद्धाला हाणून पाडणाऱया हेराची ही कहाणी आहे.
पाकिस्तानातून होणारी घुसखोरी पाहता एका हेराला मोहिमेवर पाठविण्यात येत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या वेबसीरिजची कहाणी 60 च्या दशकातील पाकिस्तानच्या कटाला उधळविणाऱया भारतीय मोहिमेने प्रेरित आहे. स्वतःचा जीव जोखिमीत टाकून गोपनीय माहिती देशापर्यंत पोहोचवून युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱया गुप्तहेरावर ही सीरिज बेतलेली आहे.
या सीरिजमध्ये प्रकाश राज हे काउंटर सर्व्हिलान्स एजेन्सी ऑफ इंडियाच्या उपसंचालकाची भूमिका साकारत आहेत. सीरिजमध्ये त्यांच्यासमवेत आदिल हुसैन, हर्ष छाया, जैन खान दुर्रानी, जोया अफरोज यासारखे कलाकार सामील आहेत.
विक्टर टँगो एंटरटेनमेंटकडून निर्मित या सीरिजचे दिग्दर्शन शिवम नायर आणि जयप्रदा देसाई यांनी केले आहे. ही 8 एपिसोड्स असणारी सीरिज 11 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.