रायगड : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या रेपोली या गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कोकणात जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाला. या अपघातामध्ये १ ठार १९ जखमी झाले असून जखमींवर माणगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमी मध्ये आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, कोकणात राजापूरकडे चाकरमान्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमाराला समोर उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला . तर १९ प्रवासी जखमी झाले यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळतात वाहतूक पोलीस घटनास्थळी रवाना झाले त्यांनी त्वरित मदत कार्य सुरू केले. सर्व जखमींना माणगाव रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात येत असताना एका प्रवासाचा मृत्यू झाला तर १९ प्रवाशांवर उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.