ऑनलाईन टीम/तरुण भारत
Kishori Pednekar News : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दादर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. मात्र, दादर पोलिसांना पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
झोपु प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यांवर आहे. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींनी चौकशीत पेडणेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आरोपीच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. शुक्रवारी चौकशी झाली त्यानंतर पून्हा पेडणेकर यांना चौकसीसाठी दादर पोलिसांनी बोलवले आहे.
हे ही वाचा : भास्कर जाधवांना चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांची नोटीस
किशोरी पेडणेकरांवर काय आहे आरोप ?
दादर येथील एसआरए प्रकल्पात किशोरी पेडणेकर यांनी गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दादर एसआरए प्रकल्प घोटाळ्यात तीन आरोपी अटकेत आहेत. अटकेत असलेल्या महानगरपालिका वसाहत अधिकाऱ्याशी किशोरी पेडणेकर यांचे व्हॉटसअप चॅट समोर आल्यामुळे पेडणेकर यांचीसुद्धा चौकशी करण्यात येत आहे. दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशीसुद्धा केली होती. यानंतर त्यांना शनिवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्या हजर राहिल्या नाही. दादर एसआरए प्रकल्पात १ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा झाला असून हे पैसे ८ ते ९ जणांकडून घेण्यात आले आहेत.