प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 20 दिवसांपूर्वी बैलहोंगल तालुक्मयातील नयानगरजवळ मलप्रभा नदी काठावर एक अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. खून करून प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह बांधून नदीत टाकून देण्यात आला होता. या खळबळजनक खुनाचा उलगडा झाला असून आपल्या अनैतिक संबंधाला आड येणाऱया पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, उपनिरीक्षक प्रवीण कोटे व त्यांच्या सहकाऱयांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
खून झालेला युवक व आरोपी धारवाड जिह्यातील आहेत. यल्लाप्पा लक्ष्मण हागेदार (वय 39, रा. गोंगडीकोप्प, ता. जि. धारवाड) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. लोखंडी रॉडने डोक्मयावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून मलप्रभा नदीत टाकून देण्यात आला होता.
गोपालसिंग सोमसिंग हजारे (वय 28, रा. हत्तीकोळ्ळ स्टेशन, धारवाड), सरस्वती यल्लाप्पा हागेदार (वय 35, रा. गोंगडीकोप्प, ता. धारवाड), कार्तिक दिनेश कायस्त (वय 28, रा. मराठा कॉलनी, धारवाड), चिदानंद प्रकाश कोरी (वय 21, रा. माळमड्डी, धारवाड), शंभुलिंग बसवंताप्पा नेनक्की (वय 29, मूळचा रा. हिरेहोन्नळ्ळी, सध्या रा. माळमड्डी, धारवाड), निंगाप्पा बसवराज तेंगीनकाई (वय 30, रा. रविवारपेठ, धारवाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या यल्लाप्पाची पत्नी सरस्वती व संशयित आरोपी गोपालसिंग हजारे यांच्यात अनैतिक संबंध होते. यल्लाप्पाला ही गोष्ट समजल्यामुळे त्याने आक्षेप घेतला होता. आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱया पतीचा प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने सरस्वतीने काटा काढल्याचे सांगण्यात आले.
दोन वाहने जप्त
28 मे 2022 रोजी नयानगरजवळ मलप्रभा नदीकाठावर अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटवून बैलहोंगल पोलिसांनी तपास हाती घेतला. अनैतिक संबंधातून या युवकाचा खून झाल्याचे उघडकीस येताच सहा जणांना अटक करण्यात आले. गुह्यासाठी वापरण्यात आलेली केए 22 ईआर 1744 क्रमांकाची मोटारसायकल व केए 53 डी 3528 क्रमांकाची ईटीयुज कार पोलिसांनी जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व सहा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.