जवळपास 1800 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची शक्यता
मुंबई
मुथूट पप्पाचन समूहाची मायक्रोफायनान्स युनिट मुथूट मायक्रोफिन 2023 च्या शेवटच्या तिमाहीत 1,500 ते 1,800 कोटी रुपयांपर्यंत प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) आणण्याच्या तयारीत आहे.
मुथूट मायक्रोफिनचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस मुथूट यांनी सांगितल्याप्रमाणे, नियोजित आयपीओकरीता मे 2023 पर्यंत कागदपत्रे सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याकडे सादर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच कंपनीने 1,200 कोटी रुपयांचे प्रांरभिक भांडवल उभारण्याची योजना आखली असून बाहेरील गुंतवणूकदार स्मॉलकॅप विक्री यासह अन्य ऑफर देणार असल्याचे कंपनीचे सीईओ सदफ सईद यांनी नमूद केले आहे. आयपीओमधून बाहेर जरी कोणी पडले तर कंपनी 50 टक्क्यांहून अधिकची हिस्सेदारी ठेवणार असल्याचेही सांगितले आहे.