आज 16 जुलैपासून आरक्षणास सुरुवात
प्रतिनिधी /मडगाव
प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे महामंडळाने नागपूर-मडगाव-नागपूर अशी आठवडय़ातून दोनदा रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
01139/ 01140 नागपूर-मडगाव -नागपूर या नावाने ही रेल्वे ओळखण्यात येणार आहे. 01139 क्रमांकाची ही रेल्वे बुधवार आणि रविवारी नागपूरहून दुपारी 3.05 वाजता सुटून दुसऱया दिवशी सायंकाळी 5.30 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर पोचेल.
01140 क्रमाकांची मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे मडगाव रेल्वे स्थानकावरुन बुधवारी आणि रविवारी 7.00 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरुन सुटेल.
27 जुलै, 30 जुलै, 3, 6, 10 ऑगस्ट, 14, 17, 21 24 व 28 सप्टेंबर रोजी 01139 क्रमांकाची ही रेल्वे नागपूरहून 3.05 वाजता सुटेल आणि दुसऱया दिवशी सायंकाळी 5.30 वाजता मडगावी पोचेल.
01140 क्रमांकाची मडगाव -नागपूर स्पेशल रेल्वे गुरुवारी व रविवारी मडगाव रेल्वे स्थानकावरुन सायंकाळी 7.00 वाजता सुटेल. 28 जुलै, 31 जुलै, 4, 7, 11 ऑगस्ट, 15, 18, 22, 25 व 29 सप्टेंबर 2022 रोजी धावेल. मडगावहून सुटणारी ही रेल्वे दुसऱया दिवशी रात्री 9.30 वाजता नागपूरला पोचेल.
ही रेल्वे करमळी, थिवी, कडाळ सिंधदुर्ग, कणकवली, नंदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, आदावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण, ईगतपूरी, नासिक रोड, भूसावळ जंक्शन, मलकापूर, अकोला, बडनेरा जंक्शन, धामणगाव, पुलगाव, आणि वर्धा जंक्शन या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल.
या रेल्वेला एकूण 22 डबे असतील. त्यात 2 टायर एसी 1 डबा, 3 टायर एसी 4 डबे, स्लीपर 11 डबे, सेकंड सिटींग 4 डबे आणि स्लीपर 2 डबे असतील.
16 जुलैपासून म्हणजे उद्यापासून या रेल्वेगाडीसाठी आरक्षणाची सोय केलेली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गिरीश कदंरीकर यांनी जारी केलेल्या निवेदनात दिलेली आहे.