प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक दूध महामंडळाने (केएमएफ) सर्व प्रकारच्या दूध दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे दहय़ाची किंमतही 2 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. नवे दर गुरुवारपासून लागू होत असल्याचे केएमएफने पत्रकाद्वारे सांगितले आहे. केएमएफने 14 नोव्हेंबर रोजी दूध आणि दहय़ाच्या किमतीत 3 रुपये वाढ केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर दरवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केएमएफला ग्राहक आणि शेतकऱयांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी केएमएफची बैठक पार पडली. यावेळी दूध आणि दही दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.