प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा येथील अंत्रुज पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच होऊन नूतन समिती निवडण्यात आली. नरेश गावणेकर यांची अध्यक्षपदी तर अजय बुवा यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वर्ष 2022-23 साठी निवडण्यात आलेली नूतन समिती पुढील प्रमाणे आहे.
उपाध्यक्ष – विवेक प्रभू व संतोष नाईक, सहसचिव उमेश नाईक, खजिनदार प्रेमानंद शिरोडकर, सहखजिनदार जगन्नाथ मुळवी, कार्यकारिणी सदस्य सदानंद सतरकर, सर्वेश पालकर, बाबुसो गावकर, अनिता प्रभू, अंजली कुडणेकर, प्रदीप नाईक, सल्लागार अजय बागकर, नरेंद्र तारी, दुर्गाप्रसाद पै व सागर मुळवी यांची निवड करण्यात आली आहे. येथील थ्रिफ्ट सभागृहात मावळते अध्यक्ष दुर्गाप्रसाद पै यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत आगामी उपक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली.
सरकारी कर्मचाऱयांसाठी आयोजित करण्यात येणाऱया अंत्रुज पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धेची तारीख व रुपरेषा निश्चित करण्यात आली. येत्या 14 व 15 जाने. रोजी फोंडा क्रीडा प्रकल्प मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. प्रेसरुमचा पाठपुरावा व अन्य विविध विषयांवर सभेत चर्चा झाली. दिवंगत सदस्य स्व. आनंद मयेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. दुर्गाप्रसाद पै यांनी वार्षिक अहवाल तर खजिनदार बाबुसो गावकर यांनी आर्थिक अहवाल सादर केला. सचिव सदानंद सतरकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. मावळत्या समितीकडून नवनिर्वाचित समितीकडे पदभार सुपूर्द करण्यात आला.