ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘NASA’s mission to the moon complete नासाची चंद्रमोहीम असलेल्या ‘आर्टेमिस-1’ मोहिमेची आज सांगता झाली. चंद्राभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी नासाचं ‘ओरियन’ हे अंतराळयान पृथ्वीवर परतलं.
नासाच्या ‘आर्टेमिस-1’ मोहिमेदरम्यान ओरियन आंतराळयान चंद्रावर पाठवण्यात आलं होतं. मून मिशन पूर्ण करून ओरियन कॅप्सूल मोठय़ा आवाजासह ओरियन पृथ्वीच्या वातावरणात शिरलं आणि कॅलिफोर्नियाच्या प्रशांत महासागरात कोसळलं. जमिनीवर कोसळताना याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूटचा वापर करण्यात आला.
एसएलएस आणि ओरियनच्या या उड्डाण चाचणीचा डेटा नासा आपल्याला भविष्यातील उड्डाणांसाठी, मानवांना चंद्रावर आणि त्यापलीकडे पाठवण्यासाठी तयार करत आहे.
अधिक वाचा : महापुरुषांच्या अवमानाची कल्पना स्वप्नातही करू शकत नाही; कोश्यारींच अमित शाह यांना पत्र