ऑनलाईन टीम/तरुण भारत
नाशिकमध्ये खासगी बस दुर्घटनेत (Nashik Bus Fire) प्रवासी होरपळल्याची घटना होऊन आता काही दिवस उलटले असताना सोमवारी (दि.१) रोजी पुण्यात शिवशाही बस (Shivshahi Bus) पेटल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा नाशिक-पुणे महामार्गावर (Nashi-Pune Highway) शिवशाही बसने पेट घेतला. त्यांनतर चालकाला ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याने प्रसंगावधान राखत बस थांबवली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळाला. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही बस पेटली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्यही करण्यात आलं. पण अवघ्या काही मिनिटांत बस जळून खाक झाली.
दरम्यान, सोमवारची घटना ताजी असताना आज पुन्हा नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील माळवाडी शिवारात भररस्त्यातच शिवशाही बसने पेट घेतल्याची घटना घडली. नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. मागून येणार्या कारचालकाने बसचालकाला वेळीच आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर बसचालकाने तातडीने बस रस्त्याच्या थांबवत सर्व प्रवाश्यांना सूचित करून खाली उतवले. बसने पेट घेतला त्यावेळी बसमध्ये एकूण ४३ प्रवासी होते.
हे ही वाचा : भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना धक्काबुक्की, गंभीर जखमी
पिंपरी चिंचवड आगरची शिवशाही बस सकाळी ७ च्या सुमारास नाशिक मधील नवे मध्यवर्ती बसस्थानक ठक्कर बाजार येथून पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील माळवाडी शिवारात बस आल्यानंतर बसची गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (वय ४१) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हळूहळू बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका कारचालकानेही पाठीमागून बस पेटल्याचे बस चालकाला सांगितले. बस चालकाने तत्काळ सर्व प्रवाश्यांना खाली उतरवले. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे बस मधील ४३ प्रवाश्यांचे प्राण बालबाल बचावले.