क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
क्रीडाभारती अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी शुक्रवारी येथे मैदानांची व क्रीडा प्रशिक्षणाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त करुन पुढील स्पर्धेची तयारी करण्याच्या सूचना केल्या. क्रीडाभारती अखिल भारतीय संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी, राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकार, क्रीडाभारती क्षेत्रीय संयोजक चंद्रशेखर जहागीरदार यांचे बेळगावात आगमन झाले आहे.
गुडशेड रोडवरील विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांच्या कार्यालयात क्रीडाभारती उत्तर कर्नाटकाचे राज्याध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, किरण जाधव यांनी वरील मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी अशोक शिंत्रे यांनी उत्तर कर्नाटकातील क्रीडाभारतीच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. आगामी उपक्रमाची रूपरेषाही सांगितली.
यानंतर राज चौधरी, प्रसाद महानकर, चंद्रशेखर जहागीरदार यांनी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावाला भेट दिली व तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली आणि तेथे सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावाची प्रशंसा केली. त्यानंतर टिळकवाडी येथील व्हॅक्सीन डेपो मैदानावर क्रीडाभारतीचे खेळाडू सराव करत होते, त्या खेळाडूंची भेट घेऊन ऍथलेटिक्सचा दर्जा व खेळाडूंच्या सरावाबाबत समाधान व्यक्त
केले.
याप्रसंगी प्रशिक्षक संजीव नाईक, बास्केटबॉल प्रशिक्षक व्ही. एस. पाटील, ज्युडो प्रशिक्षक रवी मेस्त्री, क्रीडाभारतीचे परशराम मंगनाईक, उमेश बेळगुंदकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.