वार्ताहर /किणये
हंगरगा येथील श्री स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने खास दिवाळीनिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत नावगे येथील मोरया स्पोर्ट्स क्लबने प्रथम क्रमांक पटकाविला.
60 किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा हंगरगा येथे मोठय़ा उत्साहात झाल्या. या स्पर्धांना चांगला प्रतिसाद लाभला. प्रथम क्रमांक नावगे गावातील मोरया स्पोर्ट्सने मिळविला.
या संघात संदेश मोटणकर, रक्षक कर्लेकर, सुमित कर्लेकर, भगवंत सुतार, सोमनाथ धामणेकर, सुरज करलेकर, सुनील तळवार, भरत हुलजी यांचा सहभाग आहे. या संघातील खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.