कुटुंबालाही धोका ः धमकीचे 3 ईमेल प्राप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे माजी प्रवक्ते नवीन जिंदल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जिंदल यांना मंगळवारी सकाळी 3 ईमेल प्राप्त झाली असून यात उदयपूर घटनेचा व्हिडिओ देखील अटॅच होता. जिंदल यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविल आहे.
जिंदल आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गळा चिरण्यात येईल असे या धमकीवजा ईमेलमध्ये नमूद आहे. उदयपूरच्या घटनेप्रमाणेच तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव घेऊ असे धमकी देणाऱयांनी जिंदल यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे. जिंदल यांनी ट्विटद्वारे धमकी मिळाल्याची पुष्टी दिली आहे. तसेच ईमेलचे सक्रनशॉट देखील अटॅच केले आहेत. एका वादग्रस्त वक्तव्यानंतर जिंदल यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली होती.