ऑनलाईन टीम/तरुण भारत
बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरुद्ध अजामीपत्र अटक वॉरंट जारी केलं आहे. तसेच शिवडी कोर्टाने (Shivadi Court) या वॉरंटवर मुलुंड पोलिसांनाही (Mulund Police) कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलंय. याचबरोबर मुंलूंड पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत. शिवडी कोर्टाने याबाबचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने अद्याप कारवाईला स्थगिती दिली नाही, त्यामुळे शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिलेत. याप्रकरणी ७ नोव्हेंबर रोजी पुढील कारवाई होणार आहे.