पणजी : वन-डिचोली येथील श्री महामाया कालिका देवस्थानात वार्षीक रथसप्तमी उत्सव आज शनिवार 28 रोजी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील कासार समाजेचे दैवत असलेल्या वन येथील श्री महामाया कालिका देवीच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. त्यातील हा एक महत्वाचा उत्सव असून संपूर्ण गोव्यातील ज्ञातीबांधव मोठ्या संखेने उपस्थित राहत असतात. सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यकमाना सुऊवात होणार आहे. रथसप्तमीच्या कार्यक्रमांचे यजमानपद सौ. व श्री विकास लांजेकर म्हापसा हे भूषवतील. सकाळी 6.30 सनाई वादन, 9.30 वा. लघुऊद्र, महाअभिषेक श्रसुक्त हवन, दुपारी 1 वाजता सुर्यनारायण महापूजा, आरती व तिर्थप्रसाद 1.30 वा. महाप्रसाद,
सायं. 4 वाजता देवीची ओटी भरणे व हळदीकुंकु, 5 वाजता भजनाचा कार्यक्रम 7.00वा. सितार वादन होणार आहे यात श्री. लक्ष्मीकांत खांडेकर यांचे शिष्य कु. देवांशी हरमलकर, कु.चित्राली पाटील्। तबला साथ: श्री. वैभव वझे. सायं.7.30वा. स्वर संगम गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यात सूर नवा ध्यास नवा फेम श्री. नवाब शेख, कु.अदिती मनमोहन पाटकर गायन सादर करतील त्यांना ऑक्टोपॅड वर श्री. प्रकाश पेडणेकर कीबोर्डवर श्री. महेंद्र मांजरेकर तबला: श्री.तेजस तोरसकर संवादीनी: श्री. रिशीथ होनावरकर हे साथ करताल तर कार्यक्रमाचे निवेदन श्री. संजय सालेलकर हे करतील ध्वनी मुद्रण श्री. सिध्देश नाईक यांची असणार आहे. रात्री 9 वाजता देवीच्या आवक वस्तूंची पावणी त्यानींतर रात्री 10.45 वा. श्रींची पालखीतून मिरवणूक होणार आहे. तद्नंतर श्री भावई दशावतार नाट्यामंडळ, धामूर कुडाळ दशावतार नाट्यामंडळ यांचा पौराणिक नाट्या प्रयोग माता स्तश्रृगी प्रयोग होणार आहे.