राष्ट्रवादीच्या अजित पवार गट बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या मनोगतात भावना व्यक्त
संजीव खाडे कोल्हापूर
शरद पवारांची विचारधारा आम्हाला मान्य आहे, मात्र निष्ठा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच राहिल. पक्षात दोन गट झाले असले तरी पवार साहेबच आमचे दैवत आहे. थोरल्या पवारसाहेबांच्या गटावर कोणतीही टीका-टिप्पणी करायची नाही, कोणत्याही प्रकारचे भाष्य करायचे नाही, अशा शब्दात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना मांडल्या.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गुरूवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुक्रवारी कोल्हापुरात स्वागतच्या तयारीसाठीच्या नियोजनाची बैठक झाली. मुळ राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहकाराबरोबर इतर सत्तेच्या स्थानावर, पक्षातील पदाधिकारी असणाऱ्या बहुतांश राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याऐवजी मंत्री हसन मुश्रीफ यांना साथ देत राष्ट्रवादी अजित पवार यांच्याबरोबर जाणे पसंद केले आहे. त्याचे प्रत्यंतर या बैठकीत दिसले. मुळ राष्ट्रवादीतील मंत्री मुश्रीफ यांच्यानंतरचे बडे नेते, बडे पदाधिकारी, बडे कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिलीच आढावा बैठक
राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर कोल्हापुरात प्रथमच गुरूवारी मंत्री मुश्रीफ यांच्या स्वागताच्या नियोजनाच्या बैठकीच्या निमित्ताने बैठक झाली. या बैठकीला मंत्री मुश्रीफ उपस्थित नव्हते. मात्र त्यांना मानणाऱ्या, त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेले सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कोणते पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार यांच्याबरोबर जाण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर आले आहेत याचा आढावा यावेळी घेण्यात आला. तालुकानिहाय ताकदीची चर्चा करण्यात आली. तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या आदेश, सुचनेनुसार नजीकच्या काळात राजकीय वाटचाल करण्याचे स्पष्ट करण्यात आले.
पवारसाहेबांवर, त्यांच्या गटावर टीका, भाष्य करायचे नाही
बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी भावना मांडल्या. शरद पवार साहेब आमचे दैवत आहेत. मात्र आमची निष्ठा हसन मुश्रीफ यांच्याशी आहे. मुश्रीफांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय ज्या परिस्थितीत घ्यावा लागला. त्यांना आमचा सर्वांचा पाठिंबा, पाठबळ आहे. निर्णय का घेतला ते शुक्रवारच्या कागलमधील मेळाव्यात स्पष्ट करतील, भुमिका मांडतील.
सत्तास्थानावर असलेले बहुतांश पदाधिकारी मुश्रीफांच्या पाठिशी
बैठकीत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ युवराज पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बाजार समिती सभापती भरत पाटील-भुयेकर, उपसभापती शंकर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रणवीरसिंह गायकवाड, असिफ फरास, अनिल साळुंखे यांच्यासह कोल्हापूर शहरातून महेंद्र चव्हाण, माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर, माजी नगरसेवक रमेश पोवार, प्रकाश गवंडी आदी उपस्थित हेते. यातील बहुतांश