बेंगळूरु
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी नेस्ले इंडियाने जून 2022 ला संपलेल्या तिमाहीमध्ये 515 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. सदरचा नफा हा मागच्या वर्षाच्या समान तिमाहीच्या तुलनेमध्ये चार टक्के कमी असल्याची माहिती आहे. दुसरीकडे नेस्ले इंडियाच्या एकंदर विक्रीमध्ये 15 टक्के इतकी वाढ झाली असून 4 हजार 6 कोटी रुपयांची विक्री नेस्ले इंडियाने दरम्यानच्या काळात केली असल्याचे समजते. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये एकूण खर्चामध्येही साधारणपणे 20 टक्क्यांची वाढ झाली असून तो 3355 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.