लवकरच नवीन तारीख जाहिर करण्यात येणार
आचरा प्रतिनिधी
आचरा येथील केंद्रशाळा आचरे नं .१ ता.मालवण जि. सिंधुदुर्ग या शाळेमार्फत माझी शाळा सहाय्यता निधी संकलन कार्यक्रम अंतर्गत भव्य लकी ड्राॕ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर लकी ड्राॕ सोडत गुरुवारी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता करण्यात येणार होते परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे सदरची लकी ड्राॕ सोडत पुढे ढकलणेत येत आहे , याची देणगीदारांनी नोंद घेण्याची विनंती शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे. सदरहू लकी ड्राॕ सोडतची नवीन तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.