|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » कुमार सानू यांचे हलके हलके बोल…

कुमार सानू यांचे हलके हलके बोल… 

मराठी सिनेविश्वात सध्या अनेक बदल होत आहेत. मराठी सिनेमा आपल्या कक्षा रूंदावत प्रगती करतो आहे. मराठी सिनेमांच्या चांगल्या कथा नवीन निर्मात्यांना आकर्षित करीत आहेत. ब्रम्हांडनायक मुव्हीज या निर्मितीसंस्थेने ढोल ताशे हा आशयघन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता. असाच अजून एक आशयघन सिनेमा ब्रम्हांडनायक मुव्हीज आणि ए. आर. फिल्म्स एकत्रित निर्मिती असलेला ‘हलके हलके’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

नुकतेच कुमार सानू यांच्या सुरेल आवाजात या सिनेमातील एक रोमँटिक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. हलके हलके बोलणे असे या गाण्याचे बोल असून हे गाणे सगळय़ांच्या मनात राज्य करेल यात शंका नाही. सिनेमाच्या निर्मात्या ए. अनुराधा यांचे हे गायिका म्हणून पहिले गाणे असले तरी त्यांनी कुमार सानू यांना मोलाची साथ दिली आहे. ढोल ताशे या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणारे राज अंजुटे ‘हलके हलके’ या सिनेमातून दिग्दर्शनात पर्दापण करीत आहेत. सिनेमातील कलाकारांची नावे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. ए. आर. फिल्मसच्या ए. अनुराधा आणि ब्रम्हांडनायक मुव्हीजच्या स्मिता अंजुटे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: