|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘फोर जी’ जमान्यात कॉईन बॉक्स’चं अस्तित्व आजही कायम

‘फोर जी’ जमान्यात कॉईन बॉक्स’चं अस्तित्व आजही कायम 

बाळकृष्ण मधाळे / सातारा

‘करलो दुनिया मुठ्ठीमें’ म्हणून संपूर्ण दुनिया आता हाकेच्या अंतरावर आली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या अनेक साधनांचा वापर माणसाकडून होताना दिसत आहे. पौराणिक काळात देव दानवांनी कबुतर, गरुड, रेडा, सिंह, वाघ, नंदी, उंदीर, जटायू आदी पशु-पक्षांचा सर्रास वापर दळणवळण संवादासाठी केल्याचे दाखले सापडतात. त्यानंतरच्या काळात दूरसंचार क्षेत्रात झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीने या सर्व सेवा काळाच्या ओघात मागे पडल्या. ब्रिटीश कालखंडात पोस्ट खात्याची निर्मिती होवून तार, मनीऑर्डर, पोस्टकार्ड हे मानवी संकल्पनेचे घटक बनले. त्यानंतरच्या काळात दूरध्वनी, एसटीडी, कॉईन बॉक्स, भ्रमणध्वनी आणि टपाल सेवेला सुरवात झाली. सध्या भारताची क्रांती ही फोरजीच्या दुनियेत झाली असली तरी आजही क्वॉईन बॉक्स अस्तित्व टिकून आहे.

1988 च्या काळात एसटीडी धारकांनी पिवळय़ा रंगाचे पॅकबंद पॅफे उभारुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी कर्ज काढून या क्षेत्रात आपलं भवितव्य शोधण्याचा प्रयत्न केला. पण ‘कॉईन बॉक्सची निर्मिती झाल्यामुळे एसटीडीधारकांची संख्या मंदावली. एक रुपयाचे नाणे गिळंकृत करणारे ‘कॉईन बॉक्स’ एसटीडीसाठी प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिले. एसटीडीपेक्षा कमी दरात आपली सेवा कॉईन बॉक्स बजावू लागले. या बॉक्सने शहराबरोबरच खेडोपाडय़ापर्यंत आपली मजल मारली. त्यावेळी कॉईन
बॉक्सची किंमत सर्वप्रथम 5 ते 4 हजार इतक्या किंमतीमध्ये विकला गेला. महिना बील आकारले जायचे. आजच्या फोरजी जमान्यातही कॉईन बॉक्सचे अस्तित्व †िटकून आहे. सातारा शहराचा विचार केला असता, शहरामध्ये जवळ-जवळ 300 ते 250 इतकी कॉईन बॉक्सची संख्या होती पण कालांतराने त्याची घट होवून ती संख्या अवघ्या 4 ते 5 इतक्या संख्येवरती पोहोचली आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट मोबाईल असले तरी कित्येकजण कॉईन बॉक्सचा वापर करताना दिसतात.

टेलिफोन निगमची निर्मिती होण्यापूर्वी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (डी.ओ.टी) ही केंद्र सरकारची कंपनी अस्तित्वात होती. साधारणतः 1988 च्या आसपास कॉईन बॉक्सची सुरुवात झाली. भारतामध्ये याची सुरुवात नंतरच्या काळात झाली. एक रुपयात सुविधा देणारा हा बॉक्स नाक्यानाक्यावरती दिसू लागला. इतकेच नव्हे तर, दुकाने, रुग्णालये, हॉटेल्स, कार्यालये, मेडिकल स्टोअर्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, रिक्षास्थानक, त्याचबरोबर गल्लीबोळातही या लाल पिवळया निळ्या, हिरव्या डब्याचे अस्तित्व निर्माण झाले. मोठय़ा दिमाख्यात ग्राहकांच्या मनावरती कॉईन बॉक्सने आपले बस्तान बसविले. नंतरच्या काळात मोबाईल फोनने या धावत्या जगात उडी घेतली. आणि अल्पावधीतच आपले बस्तान ग्राहकांच्या मनामध्ये पोचविण्यास सुरुवात केली. फोन, स्वस्त कॉलरेटमुळे लोकांनी कॉईन बॉक्सकडे पाठ फिरवली खरी पण, अल्पावधितच फोन, कॉलरेट अधिक झाल्यामुळे ग्राहकाला कॉईन बॉक्सशिवाय पर्याय उरला नाही. नंतर वेगवेगळे बदल होत गेले आणि पुन्हा मोबाईल फोनचे अस्तित्व निर्माण झाले ते आजतागायत आहे, पण आजच्या स्मार्ट जमान्यात कॉईन बॉक्स अजून ही टिकून आहे हे विशेष.

मोबाईल फोनचे दिवसेंदिवस महत्व वाढू लागलं व या फोनने स्मार्ट जगात उडी घेतली. घरबसल्या मोबाईलमुळे संवाद साधता येता होता. कॉईन बॉक्सवरती बोलण्यासाठी प्रतिक्षा करावी लागायची व कॉलरेट नंतर वाढल्यामुळे ग्राहकांनी बॉक्सकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. कॉईन बॉक्सच अस्तित्व धोक्यात येते की काय ? असचं वाटु लागलं पण तसं घडलं नाही. बॉक्सची संख्या जरी घटली असली तरी त्याची ग्राहकसंख्याही कमी प्रमाणात का असेना पण अजून कायम †िटकुण आहे. एसटीडी, पीओसीची नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. सध्या मोबाईलवरती सर्व सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मोबाईल खरेदीचे प्रमाण अधिक वाढले आज विविध कंपन्यांच्या मोबाईलवर फेसबुक, व्हॉट्सऍप, इंटरनेट, व्हीडीओ कॉलींग, टयुटर इत्यादी सोयीस्कर रित्या ग्राहकांच्यावरती आपल वर्चस्व कायम ठेवलं आहे.