|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » ग्रामीण भागाला 40 टक्के नोटा पुरवा : रिझर्व्ह बँक

ग्रामीण भागाला 40 टक्के नोटा पुरवा : रिझर्व्ह बँक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ग्रामीण आणि दुर्गम भागात नोटांची जास्त मागणी आहे. मात्र या भागात त्या तुलनेत नोटा पोहोचत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागात 40 टक्के नोटा पाठवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत.

नव्या नोटांचा पुरवठा करताना बँकांनी मागणी लक्षात घ्यावी. ग्रामीण भागात नोटांचा तुटवडा जाणवतो. ग्रामीण भागातील लोक त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रकमेवर अवलंबून असतात. त्यामुळे या भागांमध्ये नव्या नोटा पुरवण्याला बँकांकडून प्राधान्य देण्यात यावे, एका जिह्यातील खात्यांची संख्या लक्षात घेऊन नव्या नोटांचा पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आल्या आहेत.