|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » हैदराबादमध्ये सदनिकेत गांजाची शेती

हैदराबादमध्ये सदनिकेत गांजाची शेती 

माजी बँक अधिकाऱयाचे कृत्य : एलईडी दिवे, एसी तसेच फॅनने करायचा तापमान नियंत्रित

हैदराबाद / वृत्तसंस्था

हैदराबाद येथे पोलिसांनी 33 वर्षीय एका माजी बँक अधिकाऱयाला स्वतःच्या 3 बीएचके सदनिकेत गांजाची शेती करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या व्यक्तीने आपल्या सदनिकेत जवळपास 40 कुंडय़ांमध्ये मारिजुआना (गांजा) ची रोपे लावली होती. आरोपीचे नाव सय्यद हुसैन असून त्याने गांजाच्या शेतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले होते. तो यासाठी आपल्या सदनिकेच्या दोन बेडरुमचा वापर करायचा.

हुसेन हैदराबादच्या मनीकोंडा भागात राहतो. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा तो एका व्यक्तीला गांजा विकण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याच्या घरातून 40 कुंडय़ा जप्त केल्या आहेत. हुसेनने गांजाच्या शेतीसाठी सदनिकेत कृत्रिम तापमान कायम राखण्यासाठी व्यवस्था तयार केली होती. तो यासाठी एलईडी दिवे, टेबल फॅन आणि एसीचा वापर करायचा. याशिवाय रोपांच्या वाढीसाठी फॉस्फरस आणि पोटॅशियमचा वापर करत होता.

हुसेनने ही पद्धत एका फेसबुक प्रेंडद्वारे शिकली होती. हा मित्र अमेरिकेत वास्तव्याला आहे. पोलिसांनुसार हुसेन हा माजी बँक अधिकारी आहे. तो गांजाची शेती मागील 3 महिन्यांपासून करत होता.

 

जप्त केलेली सामग्री

8.6 किलो गांजा

गांजाची रोपे लावलेल्या 40 कुंडय़ा

वजनमापक यंत्र

3 एलईडी दिवे

Related posts: