|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जीएसटी : दुहेरी नियंत्रणावर सहमती नाही

जीएसटी : दुहेरी नियंत्रणावर सहमती नाही 

16 जानेवारीला पुढील बैठक : राज्यांची अतिरिक्त भरपाईची मागणी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जीएसटीवरून केंद्र आणि राज्यांदरम्यानचे मतभेद अजून कायम आहेत. बैठकीच्या दुसऱया दिवशीही करदात्यांवरील दुहेरी नियंत्रणाच्या मुद्यावर सहमती बनू शकली नाही. आता परिषदेची पुढील बैठक 16 जानेवारी रोजी होईल. आता राज्यांच्या अर्थ मंत्र्यांनुसार जीएसटी विधेयक लागू होण्याची कालमर्यादा सप्टेंबरपर्यंत वाढू शकते. दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जीएसटीत केंद्रीय नोंदणी करू इच्छितात.

बैठकीत जीएसटी भरपाईबाबत चर्चा झाली. अधिभाराबरोबरच जीएसटी भरपाईसाठी इतर पद्धती शोधण्यावर चर्चा करण्यात आली. अजूनही करदात्यांच्या दुहेरी नियंत्रणावर परिषदेच्या बैठकीत सर्वसंमती बनली नाही असे केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी सांगितले.

सप्टेंबरपर्यंत लागू होणे शक्य

अनेक राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटी विधेयक लागू होण्याची कालमर्यादा सप्टेंबरपर्यंत वाढू शकते असे संकेत दिले. जीएसटी परिषदेच्या मंगळवारच्या बैठकीत काही राज्यांनी हा मुद्दा उपस्थित करत नोटाबंदीनंतर आपल्याला अनुमानित 90 हजार कोटी रुपयांचा महसुली तोटा झाल्याचे सांगत भरपाईची मागणी केली.

महसूलात 40 टक्के घट

गैरभाजप शासित राज्यांनी नोटाबंदीनंतर बहुतेक राज्यांच्या महसुलात 40 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा केला. यामुळे या राज्यांनी भरपाईची रक्कम वाढवून 90 हजार कोटी रुपये करण्याची मागणी केली. याआधी 55 हजार कोटी रुपयांचा जीएसटी भरपाई निधी बनविण्याचा प्रस्ताव होता.

निर्यातीला जीएसटीबाहेर ठेवण्याची मागणी

निर्यातीला वस्तू आणि सेवा कराच्या बाहेर ठेवण्याची मागणी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आली. याचबरोबर मंत्रालयाने चर्मोद्योग, सिमेंट आणि बागवानी यासारख्या श्रमिकबहुल क्षेत्रालाही कराच्या कनिष्ठ पातळीमध्ये ठेवण्याचा आग्रह जीएसटी परिषदेच्या बैठकीत करण्यात आला. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी निर्यातदारांना जीएसटीपासून मुक्त करण्याची मागणी केली.  निर्यातदारांना पहिल्यांदाच कर दिल्याने आणि त्यानंतर त्यांना रिफंड घेण्याच्या प्रणालीमुळे नुकसान होते. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काही प्रमाणात मंदी असून निर्यातीला प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे. असे त्यांनी म्हटले.

 

Related posts: