|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महिला कामगाराची सतावणूक

महिला कामगाराची सतावणूक 

प्रतिनिधी/ फोंडा

उसगांव येथील ई मर्क कंपनीच्या व्यवस्थापनाकडून एका महिला कामगाराची मानसिक सतावणूक केल्याबद्दल कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जगदीश देसाई फोंडा पोलिसांत तक्रार नोदविण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी सायंकाळी कंपनीच्या कामागारांनी फोंडा पोलीस स्थानकावर मोर्चा आणला.

कायम स्वरुपी कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीत काम करणाऱया कामगारांनी पगारवाढ व इतर मागणीसाठी कंपनी व्यवस्थापनासमोर प्रस्ताव ठेवला आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांच्या या मागण्या प्रलंबित असल्याने मर्क कामगार संघटनेखाली वेळोवेळी निदर्शने केली जातात. मंगळवार 3 रोजी संघटनेच्या खजिनदार असलेल्या मारियाना गोम्स या संघटनेच्या इतर काही पदाधिकाऱयांना भेटण्यासाठी कंपनीच्या गेटबाहेर गेल्याने व्यावस्थापक जगदीश देसाई यांच्याकडून आपली मानसिक सतावणूक झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. काळा पोषाख परिधान करून प्रथम पाळीवरील साधारण 100 कामगारांनी फोंडा पोलीस स्थानकावर हा मोर्चा आणला. अन्य काही कर्मचाऱयांचीही कंपनीतर्फे सतावणूक चालल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

या मोर्चानंतर कंपनी अधिकाऱयांना बोलावून घेऊन निरीक्षक सुदेश नाईक यांच्याशी त्यांची चर्चा सुरु होतील.