|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » 2000च्या नव्या नोटांवरून गांधी गायब

2000च्या नव्या नोटांवरून गांधी गायब 

ऑनलाईन टीम / भोपाळ :

नोट खरी आहे की बनावट यासाठी सर्वात आधी त्यावर महात्मा गांधींचा फोटो आहे की नाही पाहिले जाते. मात्र मध्यप्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱयाच्या 2000 रूपयांच्या नव्या नोटा हाती पडताच त्यात चक्क गांधीच गायब असल्याचे चित्र दिसले.

या नोटा बनावट असल्याची शंका शेतकऱयांना आली. त्यानंतर जेव्हा ते बँकेत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती नोट खरी आहे आणि केवळ प्रिंटिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे गांधींजींचा फोटो छापला गेला नसल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. अशा प्रकारच्या अनेक नोटा बाजारात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.