|Thursday, December 5, 2019
You are here: Home » भविष्य » सिंह

सिंह 

जगावर राज्य गाजविणारी रास म्हणजे सिंह. जे काम हाती घेईन ते पूर्ण करेन, हा वज्रनिर्धार. राजवैभव, सर्वांवर हुकूमत गाजविणे, तसेच शत्रू असो वा मित्र सर्वांशी मिळते जुळते घेण्याचा स्वभाव असणारी ही रास आहे. कोणतेही काम या राशीच्या लोकांवर सोपवले असता विश्वासार्हतेनेच पूर्ण करतील. राशी स्वामी बलवान असेल तर चेहऱयावर एक राजस तेज असते. सर्व ग्रहांचा अधिपती असणाऱया सूर्यनारायणाची ही स्वराशी आहे. कुलदैवत व पितर यांचे स्वामित्त्वही याच राशीत आहे. वटवृक्ष, उपजीविका, उष्णता व पित्त यावरही या राशीचे प्रभुत्व आहे. प्रसंग पडल्यास या राशी सर्वांचे रक्षण करू शकतात. अत्यंत मानी, पटकन राग येणारी, अतिशय हुशार अशी ही रास. स्वत: वावगं वागणार नाही व  समोरील व्यक्ती अथवा नातेवाईक वावगं वागलेली न खपवून घेणारी ही रास. कोणाच्याही मदतीला केव्हाही धावून जाणे, परोपकारीपणा, तसेच शिस्तप्रिय, इतरांचे भले होऊ दे म्हणणारी रास म्हणजेच सिंह रास.

दीपा कर्माकर

विजय रूपानी

रोहित खंडेलवाल

रवी, गुरुच्या शुभाशुभत्वावर सोने व तत्सम चढउतार ठरत असतो. मृत्यूषडाष्टकात  असलेल्या राशीलादेखील आपलेपणा दर्शविणारी ही रास आहे. त्यामुळे  काहीवेळा सिंह व मकर राशीत लग्ने घडूनही त्यांचे संसार सुखात सुरळीत चाललेले आहेत. एखाद्या डॉक्टरच्या कुंडलीत जर रवी बलवान असेल तर तो जगात नाव काढेल. मृत्यूचा अधिपती यमालादेखील थांबविण्याचे सामर्थ्य आहे. तापटपणा व हुकूमशाही या वृत्तीवर नियंत्रण ठेवल्यास हे लोक जगावर राज्य गाजवू शकतात. सत्यवानाला यमाच्या पाशातून सोडवून आणणारी सावित्री व वडाचे झाड बहुधा याच राशीखाली असावेत.

 कोणाच्या तरी पुण्याईने अचानक भाग्य उजळेल. सर्वकाही अचानक घडविणारा हा ग्रह आहे. त्यामुळे अमुकच वेळी अमुकच घडेल हे सांगता येत नाही. परंतु तुमचे जीवन पूर्ण बदलून जाईल. जन्मवेळी स्थिती कशीही असो, तुमच्याकडे चातुर्य, परिश्रम, हुशारी असेल तर यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकाल.

सिंहेचा राशीस्वामी रवि असल्याने यांना पूर्व दिशा छान लाभते. भाग्य उजळण्यासाठी या राशीच्या व्यक्तिंनी रविवारी पूर्ण शुद्ध राहून दर रविवारी सूर्याला अर्घ्य वाहावे. सूर्यावर  चालणारी ही रास असल्याने डाळिंबी रंगाचे रत्न, वस्त्र अथवा गाडीचा  रंगही डाळिंबी रंगाचा असल्यास शुभ ठरेल. गुरु तुमच्या धनस्थानी असल्याने उद्योग व्यवसायात भरभराट, नोकरीत मानसन्मान वाढेल. आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्या कमी होतील. यावषी प्रवास किंवा धर्मस्थळी भेट देणे, देवधर्माकडे ओढा वाढेल. मुलाबाळांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. यावषी जीवनात सफलता, मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणारा गुरु धनस्थानी आहे. नोकरीत बदली बढतीचे योग येतील. मानसन्मान, प्रतिष्ठा, पगारवाढ, उद्योग व्यवसायात वाढ अशी शुभ फळे यावषी गुरु देऊन जाईल. यावषी संतती लाभ अथवा संततीचा विवाह ठरेल. परदेश प्रवासाचा योग येईल. व्यसन आणि व्यसनी लोकांपासून दूर रहा. कोणत्याही मुक्मया प्राण्याची हत्या करू नका. अन्यथा यांचे अशुभ परिणाम जाणवू लागतील. चतुर्थात शनि असल्याने शक्मयतो रात्रीचे दूध पिणे टाळा. अन्यथा आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. श्री महादेव आराधना यावषी नित्य चालू ठेवावी. गुप्त शत्रूंच्या कारवाया सुरू होतील. पण वरील उपाय केल्यास शत्रू नामोहरम होतील.

धनस्थानी गुरु आहे. कुबेराची कृपा म्हणता येईल. जे काही द्यायचे ते प्रचंड स्वरुपात, हा त्याचा स्वभाव. दीर्घायुष्य लाभेल. जिवावरची संकटे कमी होतील. आरोग्य चांगले राहील. इतरांना मदत कराल. वडील व थोरले बंधू यांचे आयुष्य वाढेल. तुमच्याकडे काही नसेल पण तरीही सर्व सुखे प्राप्त करू शकाल. पण पैसा बऱयापैकी मिळाला तरी त्यात समाधान राहीलच असे नाही. खानदानी घराण्याशी स्नेह संबंध जुळेल. एखाद्या निपुत्रिक व्यक्तीची मालमत्ता व इस्टेट मिळण्याची शक्मयता आहे. 12 सप्टेंबरनंतर तृतीयात आल्यावर भाग्यावर दृष्टी पडेल. दूरवरचे प्रवास घडतील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळवाल. बुद्धिमत्ता चांगली राहील. शनिच्या पीडेत दिलासा देणारा हा चांगला योग आहे. परदेश प्रवासाचे योग येतील. सर्व तऱहेने भाग्य उजळेल.

राहू 8 सप्टेंबरपर्यंत तुमच्या राशीत राहील. पूर्वजांच्या दोषाचे परिणाम जाणवतील. शिक्षणात अडथळे येतील. मात्र कलाकौशल्यात यश मिळवाल. अधिकार मात्र चांगला मिळेल. असलेली नोकरी बदलू नका. एखाद्या मित्रामुळे गोत्यात याल काळजी घ्या. घरातील गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका. धोका उद्भवण्याची शक्यता. यानंतर राहू 12 व्या स्थानी येईल. गृहसौख्यात बाधा निर्माण करणारा हा योग आहे. करणी बाधा, वास्तुदोष, शत्रुपीडा यादृष्टीने हा राहू त्रासदायक आहे. कुणाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. पिशाच्च बाधा होण्याची शक्मयता. एखादा आनुवंशिक रोग निर्माण होण्याचे लक्षण. पण परदेश प्रवास व पशुपालन व्यवसायात चांगले यश मिळवाल.

यावषीही हर्षल ग्रह अष्टमात आहे. अपघात, आजार, दुर्घटना व अती आत्मविश्वासामुळे धोक्मयात  याल. अपस्मार, पक्षाघात, यांत्रिक दुर्घटना, कोर्टदरबारी अपयश व फसवणूक. वडिलोपार्जित मालमत्तेत नको त्या भानगडी निर्माण होतील. नेपच्यून ग्रह सप्तमात आहे. वैवाहिक जीवनात फसवणूक, भागीदाराकडून हानी, दुर्घटना, अडचणी येतील. प्लुटो हा ग्रह वर्षभर त्रिकोणात राहणार आहे. मौल्यवान साधनसंपत्ती खरेदी करण्याकडे कल राहील. समाजावेगळय़ा गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल पण नंतर ते अंगलट येईल.

यावषी हर्षल, गुरु, शनि व दोन ग्रहणे यांचा जोरदार प्रभाव या राशीवर दिसून येईल. 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण आध्यात्मिक शक्ती वाढविल. परंतु काही बाबतीत अतिरेकही वाढवेल. 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण आर्थिकदृष्टय़ा उत्तम असले तरीही मानसिक संभ्रम निर्माण करेल. 7 एप्रिलला हर्षलचे भ्रमण भाग्यस्थानी होत आहे, हा एक प्रकारचा अत्यंत शुभयोग आहे. ध्यानीमनी नसता दूरचे प्रवास, भाग्योदय, दैवीकृपा,  शिक्षणात यश, परिस्थितीला अचानक चांगली कलाटणी मिळेल. या हर्षलचा प्रभाव आगामी 7 वर्षे राहील.


मासवार फलप्राप्ती

जानेवारी – संक्रांतीपर्यंत लक्ष्मीप्राप्तीच्या दृष्टीने शुभ. सर्व कामात यश पण संततीच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यानंतरचा काळ जरा अडचणीचा आहे. मघा नक्षत्र असेल तर वर्षभर सतत प्रवास घडत राहतील. पूर्वा व  उत्तरा नक्षत्राच्या लोकांना सर्व तऱहेचे सुखोपभोग मिळतील. या महिन्यात रवीची आराधना करा.


फेब्रुवारी- पैसा अडका व आरोग्याच्या दृष्टीने मध्यम योग. सरकारी कामात अडचणी. विनाकारण खर्च करण्यासाठी मध्यस्थी केल्याने निष्कारण गैरसमज होतील. महाशिवरात्री व्रत करा. आरोग्य सुधारेल, तसेच घराण्यातील शापीत दोष नष्ट होतील. एखाद्याचे चांगले करायला जाल, पण नेमकी ती व्यक्ती उलटण्याची शक्मयता.


मार्च-किरकोळ कारणावरून कडाक्मयाचे मतभेद होतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्यास त्रासदायक. अति दूरवरचे प्रवास टाळावेत. तुमच्या राशीतच होणारी होळी पौर्णिमा चांगली नाही. कुणाशीही शत्रुत्व येणार नाही यासाठी जपा. आर्थिक क्यवहार यशस्वी होतील. घरमालक व भाडेकरू संबंध सुधारतील. एखाद्या नातेवाईकासाठी बराच खर्च करावा लागेल. मंगळ प्रभावी असल्याने सर्व प्रकारे शुभ फळे मिळतील. थोरामोठय़ांचा सल्ला अतिशय उपयोगी पडेल. भावंडांशी संबंध चांगले ठेवावेत. आर्थिक उत्कर्ष होईल. वाहन मात्र जपून चालवावे. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून आपल्या किमती वस्तू सांभाळाव्यात.


एप्रिल- भाग्यातील बुध असल्याने सरकारशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम होईल. फिरत्या व्यवसायात नव्याने शिरु नये, नुकसान होईल. नातलगांची भरभराट होईल. व्यवसाय व्यवस्थित चालेल. पंचमात शनि असल्याने स्वत:च्या नावावर घर बांधू नये, मुलांना त्रासदायक ठरेल. यावषी घरातील सोने विकू नका, मातीमोल दर मिळेल. कुटुंबियांनी डोळय़ांची काळजी घ्यावी. उत्तरार्धात राशीस्वामी रवि बलवान येईल. त्यानंतर परिस्थिती अनुकूल राहील.


मे- अत्यंत महत्त्वाची कामे 15 तारखेपर्यंत करून घ्यावीत. यश मिळेल. शिक्षणात चांगली प्रगती  होईल. परदेशी जाण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण करू शकाल. सामाजिक मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवाल. शेतीवाडीचे व्यवहार सुरळीत चालतील. कमाई व खर्च यांचे प्रमाण समान राहील. अनैतिक व समाजविघातक कामापासून दूर रहा. या महिन्यात स्टीलच्या वस्तू चुकूनही खरेदी करू नका. लग्न कार्यासाठी अर्धवट चर्चेसाठी बोलावणे आल्यास त्यात भाग घ्या. तुमचा सल्ला अथवा प्रयत्नामुळे एखाद्याचा संसार उभा राहील.


जून-राशीस्वामी रवी नाखूष असल्याने काळ जरा अडचणीचा आहे. आरोग्याची  काळजी घ्या. प्रवासात लाभ तसेच अपेक्षित कामात यश मिळवाल. घरगुती समस्यांच्या बाबतीत योग्य मार्ग निघेल. वास्तुसंदर्भात वाटाघाटी होतील. मित्रमंडळींकडून चुकीच्या सल्ल्यामुळे धोका, नुकसान व अपघात योग. स्वत:चे वाहन व इतर किमती वस्तू या महिन्यात कुणालाही देऊ नका.


 जुलै- बाराव्या स्थानी येणारा बुध विचित्र फळे निर्माण करणारा आहे. कुटुंबात शुभ कार्य होतील. अत्यंत अवघड समस्या मिटतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग. 11 तारखेस मंगळ बारावा येईल. कोणत्याही सरकारी प्रकरणात अडकणार नाही याची काळजी घ्या. कुणाला तरी वाचवायला जाऊन स्वत:च कोठे तरी अडकण्याची शक्मयता. तापटपणावर नियंत्रण ठेवा. पैशाची चणचण भासेल. सजावट व धार्मिक गोष्टीसाठी खर्च होण्याची शक्मयता. मंगळाचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवा.


ऑगस्ट-ग्रहमान अनकूल आहे. जेथे अपेक्षा नाही अथवा ज्यांच्याकडून आशा नाही अशा व्यक्ती ऐनवेळी मदत करतील व स्वत:ला प्रति÷ित समजणाऱयाकडून ऐनवेळी धोका होईल. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय त्या काळात घेऊ नका. 15 ऑगस्टनंतर सर्व कामात यश मिळेल. अडलेले व्यवहार, नोकरी, उद्योग, व्यवसाय व्यवस्थित चालू लागतील. कर्ज व इतर प्रकरणामुळे खोळंबलेले व्यवहार सुरळीत चालू लागतील. आरोग्य उत्तम राहील. मुलाबाळांच्या समस्या मिटतील. 21 रोजी तुमच्या राशीत बुध येत आहे. सर्व कामात यश देईल. सरकारी कामातील अडचणी कमी होऊ लागतील.


सप्टेंबर- गुरु अनुकूल आहे तोपर्यंत कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करून घ्या. 12 तारखेला गुरु तृतीयेत जाईल. भावंडांशी चांगले संबंध ठेवल्यास या गुरुची शुभ फळे मिळतील. त्यांचे उत्तम सहकार्य राहील. आयुष्यमान वाढेल. आर्थिक सुधारणा होऊ लागतील. प्रगतीची घोडदौड सुरू राहील. पूर्वजांचे धन अथवा इस्टेट असेल तर ती मिळेल. बुद्धिमत्तेचे तेज सर्व क्षेत्रात दिसून येईल. पेन्शनचे काम अडले असेल तर ते मार्गी लागेल.


ऑक्टोबर- मित्रमंडळीसाठी बराच खर्च होईल. 13 तारखेस मंगळ धनस्थानी आल्यावर जबाबदारी वाढेल, पण त्या प्रमाणात पैसा मिळणार नाही. हॉटेल, धाबा, मिठाईचा व्यवसाय, अकौंटन्सी तसेच लोखंडाशी संबंधित असाल तर चांगला फायदा होईल. लढाई, झगडे, दंगल यापासून दूर राहणे आवश्यक समजावे. बुधाचे तृतीयेतील आगमन लिखाणात चांगले यश मिळवून देईल. घरात चुकूनही अपशब्द काढू नका अन्यथा त्याचे वास्तुवर अनिष्ट परिणाम जाणवतील. वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असाल तर याच महिन्यात बदला.


नोव्हेंबर- गुरु, शुक्राचा सहयोग कलाकौशल्यात मोठे यश मिळवून देईल. पुष्कळ प्रवास घडेल. भावंडांचे सौख्य उत्तम. एखादे नवीन शिक्षण घेण्याचा योग. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. पण तरीही जमाखर्चाचा ताळमेळ साधला जाईलच हे सांगणे कठीण. सावधानता बाळगा. धनस्थानातील मंगळ खर्चात वाढ दर्शवितो. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हेवेदावे निर्माण होतील. 18 ची अमावस्या प्रवासात अघटीत दर्शविते. तसेच नातेवाईकांशी संघर्ष होण्याची शक्मयता. कोणतेही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न या महिन्यात करा, यशस्वी व्हाल! गुरुपुष्यामृत योगावर  आध्यात्मिक शक्तीचा प्रत्यय येईल.


डिसेंबर- दशमस्थानी होणारी 3 तारखेची पौर्णिमा सर्व बाबतीत अनुकूल आहे. 10 डिसेंबरला वक्री बुधाचा चतुर्थातील प्रवेश कौटुंबिक सुखाला चांगला नाही. नोकरीत बदली किंवा स्थलांतर योग. मातापित्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उत्तरार्धात रवि, शनिची युती मुलाबाळांच्याविषयी सावधानता बाळगावी लागेल. त्यांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या. किरकोळ वादावादीतून गंभीर प्रसंग निर्माण होतील. त्यादृष्टीने 18 ते 19 दरम्यान काळजी घ्यावी. हर्षल, गुरुचा प्रतियोग एखादे मोठे काम यशस्वी करून दाखवेल. राहु, केतुचे भ्रमण कोणत्याही बाबतीत शुभ फलदायी नाही. त्यांचा त्रास होऊ नये यासाठी कुलदैवताची उपासना करावी.

Related posts: