|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लंगडी-पळती स्पर्धेत ज्योतिर्लिंग विदयालयाची बाजी

लंगडी-पळती स्पर्धेत ज्योतिर्लिंग विदयालयाची बाजी 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

    गांधी मैदान येथे सुरू असलेल्या मनपास्तर क्रीडा स्पर्धेत बुधवारी झालेल्या 9 वर्षे गटातील लंगडी-पळती स्पर्धेत ज्योतिर्लिंग विदयालयाने मुले-मुली दोन्ही गटातील अजिंक्यपद पटकविले. या स्पर्धेत मनपाच्या विविध शाळांमधून 48 मुले-मुलींच्या संघांनी सहभाग नोंदविला होता.

मुलींच्या गटात झालेल्या लंगडी-पळती अंतिम सामन्यात ज्योतिर्लिंग विदयालयाने  महात्मा फुले विदयालयावर 14-8 गुणफरकाने विजय मिळविला. विजेता ज्योतिर्लिंग विदयालयाचा मुलींचा संघ – श्रुती सुपलकर, प्रतिभा बाडगी, प्रज्ञा मगदूम, माया नन्नूचे, संस्कृती पोवार, सना फकीर, सोनाली नन्नूचे,  नंदीनी सोनकर, तेजस्विनी सुतार, प्रतिक्षा पाटील, प्रांजली पाटील, प्रशिक्षक – प्रतिभा कांबळे.

 तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात ज्योतिर्लिंग विदयालयाने उर्दू-मराठी सरनाईक वसाहत संघावर 22 विरूध्द 9 गुणफरकांनी मात केली. तर दुसरया उपांत्य सामन्यात महात्मा फुले विदयालयाने प्रिन्स शिवाजी विदयालयावर 13 विरूध्द 5 गुणफरकांनी विजय मिळवून अंतिमफेरीत प्रवेश केला.

दुपारच्या सत्रात झालेल्या मुलांच्या गटातील लंगडी-पळती अंतिम सामन्यात ज्योतिर्लिंग विदयालयाने महात्मा फुले विदयालयावर 13 विरूध्द 8 गुणफरकाने विजय मिळवून स्पर्धेतील अजिंक्यपद पटकविले.

Related posts: