|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डुक्कर आंदोलन आयुक्तांसह प्रशासनाला चांगलेच झोंबले

डुक्कर आंदोलन आयुक्तांसह प्रशासनाला चांगलेच झोंबले 

वार्ताहर/ सोलापूर
अलीकडे स्मार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱया सोलापूरच्या स्मार्ट महापालिकेच्या प्रशासकीय गलथानपणाचा कळस संबंध शहरवासीयांना परिचीत आहे. डेंगू डास, कचरा, गढूळ पाणी यांसारख्या अनेक विषयांमुळे शहरात संतापाची लाट उठते. पण दोन दिवसापुर्वी युवासेनेकडून केलेल्या डुक्कर आंदोलनाने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्यासह प्रशासनाला चांगलेच झोंबले आहे. एका कार्यक्रमात आयुक्तांनी युवकांनी केलेला ह्या पोरखेळीने प्रशासनाची बदनामी होणार नसल्याचा उलट फेरा घेतला. पण कोणत्याही प्रश्नावर उशिरा जागे होणारे प्रशासन कधी शिस्तीत कारभार करणार या प्रश्नाचे उत्तरे द्यावे अशी इच्छा शहरवासीयांची आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात डुकरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेकदा वाहनांच्या मध्येच डुकरे आडवी येत असल्याने वाहतूकीची कोंडी ही होत आहे. तसेच अनेक नागरिकांना डुक्कर चावल्याचा घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने डुक्कर विरोधी आंदोलन करण्यात आले होते. शिवसेने महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या टेबलावर डुकराच पिल्लू बसवून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी मोठय़ा प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. मात्र शिवसेनेच्या या डुक्करविरोधी आंदोलनाला नागरिकांचा पाठींबा असल्याची चर्चा आहे.
शहरातील विविध ठिकाणी डुकरांच्या झालेल्या उच्छादावरुन युवा सेनेच्यावतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा उठाव करण्यात आल्याने महापालिकेडून तातडीने यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, हे पथक शुक्रवारपासून वराह बंदिस्ताची मोहिम हाती घेणार आहे. शहरात वराह नष्ठ करण्यासाठी वराह पालन करणाऱयांवर पोलीस कारवाई करण्यात आली.
वराह बंदिस्त करण्याची मोहिम शहरात एमआयडीसी येथून सुरु करण्यात येणार असून, शहरातील शास्त्रीनगर, मौलाली चौक, होटगी रोडवरील मंत्रीचंडक इस्टेट, सुरवसे मित्र नगर मैदान, सहारा विजापूर रोड, पुणे रोड यासह सर्वत्र घेण्यात येणार आहे. जोपर्यंत शहरातील वराह पुर्णपणे नाहीसे होणार नाहीत तोपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. आंदोलकांनी गैरमार्गाचा अवलंब करुन आयुक्तांच्या खुर्चीवर डुकराचे पिल्लू ठेवण्यात आले होते. यावरुन गुरुवारी दिवसभर महापालिकेत तणावाची स्थिती होती. महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी त्या आंदोलकांवर गुन्हादाखल करुन 13 जणांना अटक केली. तर दुसरीकडे या आंदोलनाच्या अनुषंगाने आयुक्तांनी शहरातील वराहसंदर्भात आरोग्य विभागाकडे आढावा घेतला. शहरातील विविध 46 जण वराह पालन करत असल्याची माहिती प्राप्त झाली असून, यापैकी सात जणांना वराह उचलून नेण्यासंबंधीची नोटीस बजावण्यात आली. एकूणच शहरात प्रत्येक महिन्याला कोणता तरी प्रश्न उद्भवश तेंव्हा प्रशासनाची धावपळ सुरु होते. आता हे प्रशासन कधी जागे होणार याचे उत्तर शोधावे.

Related posts: