|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरपूरात होणार तारांकित हॉटेल

पंढरपूरात होणार तारांकित हॉटेल 

पंढरपूर / प्रतिनिधी

  राज्यांची आध्यात्मिक राजधानी असणा-या पंढरपूरात येत्या काळामधे सात वर्षापूर्वी झालेल्या भूमिपूजनांच्या आधारावर नव्याने त्रिस्टार हॉटेल होणार आहे. त्यामुळे पंढरीच्या आध्यात्मिक पर्यटनाला आता चालना मिळणार आहे.

  पंढरपूर हे राज्यातील महत्वांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे प्रतिवर्षाला सुमारे 1 कोटींच्या आसपास भाविक येत असतात. त्यामुळे येथे पूर्वी भक्त निवासांची गरज होती. त्यावेळी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने येथे भवत निवास बांधून ते येथील श्री विठठल रूक्मिणी मंदिर समितीला देउ केले आणि त्यांच्याकाडून काही काळ पंढरीत चालवले देखिल गेले. मात्र गेल्या दोन वर्षापासून येथील एमटीडीसींच्या भक्त निवासांची अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे सदरचे भक्त निवास हे बंद अवस्थेत आहेत. आता हेच भकतनिवास मंदिर समितीकडून काढून घेउन शासनांचे पर्यटन खाते या जागेवर त्रिस्टार हॉटेल उभा करणार असल्यांचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतेच सोलापूर येथे एका कार्यक्रमांसाठी आल्यावर जाहीर केले.

  पंढरपूरामधे सात वर्षापूर्वी जिल्हयांचे नेते विजयसिंह मोहीते पाटील पर्यटनमंत्री असताना त्यांनी पंढरपूरात त्रिस्टार हॉटेल उभा करण्यासंबधीची घोषणा केली होती. त्यावेळी यासंदर्भात येथील एमटीडीसींच्या आवारामधे भूमिपूजन देखिल करण्यात आले होते. मात्र याबाबत पुढे शासनांच्या उदासीन धोरणामुळे पंढरपूरकरांचे त्रिस्टार हॉटेलचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आता सात वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या जागेंच्या आधारावरच पर्यटन खातं पुन्हा एकदा पंढरपूरात त्रिस्टार हॉटेल उभा करण्यांच्या मनस्थितीमधे असल्यांचे †िदसून येत आहे.

  मात्र यावेळी शासनाकडून फ्ढक्त घोषणा नको , अंमलबजावणी हवी अशी माफ्ढक अपेक्षा पंढरपूरकरांकडून आहे. कारण पंढरपूरामधे त्रिस्टार हॉटेल उभे राहेले . तर भविष्यात मोठया प्रमाणावर येथे विदेशी पाहुणे येउन विठठल दर्शन घेउ शकतात. त्यामुळे पंढरीचे आध्यात्मिक पर्यटन देखिल मोठया प्रमाणावर वाढीस लागणार आहे.

  आजमितिला अनेक विदेशी पाहुणे तसेच अनेक हायक्लास पाहुणे पंढरीत येउन काही तासांपुरते थांबून परततात. सदरचे पाहुणे येथे थांबून येथील इतर मंदिरांना केवळ राहण्यांच्या चांगल्या सोयीसुविधांमुळे अपुरे पडत आहेत. याचसाठीच येथे गेल्या अनेक वर्षापासून तारांकित हॉटेलची गरज होती. मात्र आता ही गरज भाजपा सरकार पूर्ण करेल ? अशी अपेक्षा आहे. कारण सध्यातरी भाजपा सरकार हे नमामी चंद्रभागा , तुळशी उद्यान , नामसंकीर्तन सभागृह अशा विविध पंढरींच्या विकासकामांच्या गोष्टीसाठी सकारात्मक असल्यांचे दिसून येत आहे. याबात काही विकासकामांना लवकरच सुरूवात देखिल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात थ्री स्टार हॉटेल होईल अशी आशा आहे.

Related posts: