|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » तिकिटासाठी दबाव टाकू नये ; पंतप्रधानांचा इशारा

तिकिटासाठी दबाव टाकू नये ; पंतप्रधानांचा इशारा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ज्याची लायकी असेल त्याला निवडणुकीसाठी तिकीट मिळेल. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे, यासाठी दबाव टाकू नये, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद मोदींनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना पंतप्रधानांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, सध्या पक्षातील अनेक नेते मंडळी आपल्या नातेवाईकांमधील किंवा परिचयाच्या व्यक्तींना निवडणुकीसाठी तिकीट मिळावे, यासाठी दबावतंत्राचा वापर करतात. त्यामुळे आपल्या परिवारातील लोकांना तिकीट मिळावे, यासाठी दबाव टाकू नये, ज्याची लायकी असेल त्याला तिकीट देण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला.

Related posts: