|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मराठी उद्योग भूषण पुरस्कार गजानन कुडाळकर यांना प्रदान

मराठी उद्योग भूषण पुरस्कार गजानन कुडाळकर यांना प्रदान 

कुडाळ : हॉटेल व कृषी पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुडाळ येथील गजानन कुडाळकर यांना मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाच्यावतीने मराठी उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

दादर-मुंबई येथील राजा शिवाजी विद्यासंकुलाच्या प्रि. बी. एन. वैद्य सभागृहात मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेचे मानद सचिव अनंतराव देशपांडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाच्या अध्यक्षा अचला जोशी होत्या. संस्थेचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर, संघटन कार्यवाह मकरंद चुरी तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. कुडाळकर यांचा तालुक्यातील मुळदे येथे कृषी पर्यटन प्रकल्प असून रिसॉर्ट तसेच एमटीडीसी अंतर्गत न्याहारी योजनाही ते राबवित आहेत.

कुडाळकर म्हणाले, आपल्यासारख्या सामान्य माणसाला मिळालेल्या या बहुमानामुळे यापुढे प्रोत्साहन मिळत राहील. आपल्या बागेत नारळ, आंबा, काजू, सुपारी याबरोबरच आपण इतर सर्व झाडे, औषधी वनस्पती तसेच बांबू, कोकम, फुलझाडे लावून पर्यावरण संवर्धन आणि कोकण आणखी सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याला जोड म्हणून आता शेती पर्यटन करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रयत्न व प्रेरणेतून रिसॉर्ट निर्माण केले. पर्यटकांनी पुन्हा-पुन्हा कोकणात यावे, यादृष्टीने आपले यापुढेही प्रयत्न राहतील. या कार्यक्रमास संजय परब, राजू वडळकर, साटम, विकास कुडाळकर, श्री. मठकर, श्री. करंगुटकर, केसरी पाटील आदींची उपस्थिती होती.

Related posts: