|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » फोंडाघाटला आगीत घर बेचिराख

फोंडाघाटला आगीत घर बेचिराख 

कणकवलीफोंडाघाट-हवेलीनगर येथील अजित राधाकृष्ण नाडकर्णी यांच्या घराला लागलेल्या आगीत सुमारे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले. यात नाडकर्णी यांच्या घराचे 48 हजार रुपयांचे, तर दोन भाडेकरुंच्या रोख 10 हजार रुपयांसह 42 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास लागली. आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

फोंडाघाट-हवेलीनगर येथे अजित नाडकर्णी यांचे घर आहे. ते स्वतः तेथे राहत नाहीत. मात्र, या घरात दोन भाडेकरू राहतात. शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भाडेकरू बाहेर गेले असताना अचानक घरातून धूर येऊ लागला. त्यामुळे भाडेकरू व आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग विझविण्यास सुरूवात केली. कणकवली नगर पंचायतीचा बंबही बोलावण्यात आला.

स्थानिक नागरिक व बंबच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तरीही घराचे छप्पर तसेच भाडेकरूंच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. यात छपराचे 48 हजार रुपये, भाडेकरू सूर्यकांत तुकाराम चव्हाण यांची टीव्ही, फॅन, डायनिंग टेबर, भांडी, टेबल, खुर्ची, मिक्सरसह इतर वस्तूंचे 26 हजार 600 रुपये तसेच रोख 10 हजार रुपयांचे तसेच नारायण नागोजी तावडे यांच्या फॅन व कपडय़ांचे 5 हजार रुपयांचे नुकसान झाले.

आग लागल्याचे समजताच जि. प. सदस्य सुदन बांदिवडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशिदास रावराणे, अण्णा तेंडुलकर, सरपंच पवार, पोलीस पाटील पवार, राजन चिके, राजू नानचे आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला.

दरम्यान, फोंडाघाट विभागाचे मंडळ अधिकारी दिलीप पाटील, तलाठी सुतार यांनी पंचनामा केला असून अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला आहे.

Related posts: