|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » संभाजी ब्रिगेड पालिकेच्या सर्व जागा लढविणार

संभाजी ब्रिगेड पालिकेच्या सर्व जागा लढविणार 

प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची घोषणा ; आतापर्यंत 170 जागांचे अर्ज प्राप्त

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 296 तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड हा पक्ष लढवणार आहे, असे ऍड. आखरे यांनी जाहीर केले. दादरच्या ऐतिहासिक शिवसेना भवनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले चित्र हटवा, नाहीतर ब्रिगेड आपल्या पद्धतीने ते चित्र काढून टाकेल, अशी धमकी संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई महापालिकेसह 10 पालिका, 26 जिल्हा परिषद आणि 296 तालुका पंचायत समित्यांची निवडणूक लढवून राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. मुंबई महापालिकेतील 170 जागांसाठी अर्ज आले असून आम्ही सर्व 227 जागा लढविणार असल्याचे आखरे यावेळी म्हणाले.

राज्यात शांतता आणि दंगल मुक्त महाराष्ट्र घडविण्याचा आमचा संकल्प आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम शिवरायांच्या नावाचा वापर करत राजकारण केले. मुस्लीम आणि मराठय़ांमध्ये दंगली पसरवल्या. आता शिवसेनेला शिवरायांपेक्षा बाळासाहेब मोठे वाटू लागले आहेत. जर तुम्हाला याचे उदाहरण बघायचे असेल तर दादर येथे जा. शिवसेना भवनावर छत्रपती शिवराय छोटे आणि बाळासाहेब मोठे दाखवण्यात आले आहेत. शिवसेनेने शिवरायांची ही केलेली बदनामीच आहे, असा आरोप आखरे यांनी यावेळी केला. जर शिवसेनेने या चित्रांमध्ये बदल करून शिवाजी महाराजांना अग्रस्थानी आणले नाही तर ब्रिगेड पद्धतीने आम्ही बाळासाहेबांचे चित्र हटवू, अशी धमकी आखरे यांनी तदिली.