|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विकास आराखडा नियोजित भागांना लागू नाही

विकास आराखडा नियोजित भागांना लागू नाही 

एमएमआरडीएची माहिती; 14 गावांचा मात्र समावेश

वसई : मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 2016 ते 2036 करिता लागू केलेला विकास आराखडा हा ज्या प्रदेशात मंजूर विकास आराखडा लागू आहे त्या “िकाणी लागू असणार नाही. तर कोणतेही नियोजन नसलेल्या वसई-विरार उपप्रदेशातील 14 गावांना मात्र हा आराखडा लागू राहील.

जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रा. विन्सेंट परेरा तसेच रुपेश रॉड्रीग्ज यांनी एमएमआरडीएशी संपर्क साधून वसई-विरारमध्ये 2004 मध्ये सिडकोने तयार केलेला वसई-विरार उपप्रदेशाचा विकास नियोजन आराखडा 2021 पर्यंत लागू असल्याने या “िकाणी एमएमआरडीएचा आराखडा लागू होणार नाही. याबाबतचे स्पष्टीकरण एमएमआरडीएने या कार्यकर्त्यांना दिले आहे. तसेच ज्या गावांना हा आराखडा लागू नाही त्या दापिवली, करंजोण, माजीवली, मोरी, नागले, पारोळ, पोमण, सायवण, शारजा-मोरी, शिलोत्तर, शिरवली, शिवणसई, तिल्हेर, उसगाव या 14 गावांना एमएमआरडीएचा आराखडा लागू राहील, असेही एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एमएमआरडीएचा विकास आराखडा आधी लागू असलेल्या नियोजन आराखडय़ामुळे वसई-विरार शहर महापालिका क्षेत्र व भोवतीच्या विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रासा”ाr मंजूर विकास आराखडा व त्याची विकास नियंत्रण नियमावली लागू राहील, असे एमएमआरडीएच्या नियोजन विभाग प्रमुख उमा अडूसुमिल्ली यांनी या संदर्भात लेखी पत्र देऊन समिती कार्यकर्त्यांना स्पष्ट केले आहे.

एमएमआरडीएच्या विकास आराखडय़ात प्रस्तावित असलेला कोस्टल रोड (समुद्री मार्ग) हा नायगावच्या खाडीवरून वसई स्टेशन, समेळ पाडा, सोपारा, बोळींजच्या मागच्या बाजुने वैतरणा खाडीपर्यंत जातो. हा मार्ग वसई-विरार पट्टय़ातून जात आहे. तर वसईच्या पूर्वपट्टीतून अलिबाग-विरार कॉरीडॉर जात आहे. यामुळे वसई-विरारच्या स्थानिक भूमिपूत्रांना घाबरण्याचे कारण नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts: