|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » एसटी बसस्थानक होणार हायटेक

एसटी बसस्थानक होणार हायटेक 

अत्याधुनिक बसपोर्ट 9 ठिकाणी विकसित होणार; परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसमोर सादरीकरण

मुंबई / प्रतिनिधी

सर्वसामान्य प्रवाशांना विमानतळावर असल्याचा भास होईल, असे अत्याधुनिक बसपोर्ट महाराष्ट्रातील 9 ठिकाणी खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून लवकरच विकसित होणार असल्याचे घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या दालनात याबाबत नामवंत वास्तुविशारद शशू प्रभू यांनी आधुनिक बसपोर्टलच्या संकल्पनेचे सादरीकरण केले. बोरिवली-नॅन्सी कॉलनी, पनवेल, शिवाजीनगर-पुणे, पुणेनाका बसस्थानक-सोलापूर, महामार्ग बसस्थानक नाशिक, मध्यवर्ती बसस्थानक-औरंगाबाद, मध्यवर्ती बसस्थानक-नांदेड, मध्यवर्ती बसस्थानक अकोला आणि मोरभवन बसस्थानक-नागपूर अशा 9 बस आगारांचे रुपांतर बसपोर्टमध्ये केले जाणार आहे. तसेच याचा कोणताही खर्च एसटी महामंडळावर पडणार नसून तो खाजगी कंपनी करणार आहे. बसपोर्ट विकसित करण्याच्या मोबदल्यात संबंधित कंपनीला व्यापार संकुल उभारण्यास जागा एसटी महामंडळ देणार आहे. या बसपोर्टची देखभाल पुढील 30 वर्षे संबंधित कंपनीच करणार आहे.

  बस पोर्टमध्ये नेमके काय असेल ?

बस पोर्ट हे बस आगारांचे अत्याधुनिक स्वरुप असेल. यामध्ये बस प्रवासी आणि बसगाडय़ा यांचे चलनवहन स्वतंत्ररित्या केले जाणार आहे. त्यामुळे बस पोर्टमध्ये कोठेही वाहूक कोंडी होणार नाही. प्रवाशांसाठी अधिक प्रशस्त असे मोठे प्रतिक्षालय उभारण्यात येणार असून तेथेच प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.

Related posts: