|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » जम्मू काशमीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू काशमीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार 

ऑनलाईन टीम / जम्मू -काशमीर :

जम्मू काशमीरमधील बंदीपोरमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवादाचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

बंदीपोर जिल्हातील पराय मोहल्ला हाजीन या भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. मंगळवारी पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या परिसरात शोधमोहीम राबवली. यादयम्यान सुरक्षा यंत्रणा आणि दहशतद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे.