|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नागरी सुविधा स्थलांतरानंतर उड्डाणपुलाचे काम मार्गी

नागरी सुविधा स्थलांतरानंतर उड्डाणपुलाचे काम मार्गी 

प्रतिनिधी/ बेळगाव

जुना धारवाड रोड येथील फाटकावर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे खात्याने हालचाली चालविल्या आहेत. मागील आठवडय़ापासून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार होते. मात्र रहदारी वळविल्यानंतर काम सुरू करण्याची विनंती रेल्वे खात्याला करण्यात आल्याने काम थांबविण्यात आले आहे. मात्र येथील विद्युत वाहिन्या व दैनंदिन नागरी सुविधांचे स्थलांतर झाल्याखेरीज काम सुरू करता येणे शक्मय नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कपिलेश्वर रोड येथील उड्डाणपुलाचे काम संपल्याने वाहतुकीस खुला झाला आहे.  यामुळे जुना धारवाड रोड येथील उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होईल, अशी अपेक्षा होती. उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याची तयारी रेल्वे खात्याने केली आहे. काम हाती घेतल्यानंतर लागलीच येथील फाटक बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे. याकरिता जिल्हा प्रशासन, महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन रहदारी वळविण्याचे  नियोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर काम सुरू करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केली होती. यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले नाही. मात्र उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी येथील विद्युत वाहिन्या, टेलिफोन वाहिन्या, जलवाहिन्या, ड्रेनेज वाहिन्या हटविण्याची गरज आहे.

  पायाखोदाईसाठी अत्याधुनिक ड्रील मशीनचा वापर

हा रस्ता चार पदरी होणार असल्याने एका ठिकाणी दोन खांब उभारण्यात येणार असून खांबांच्या पायाखोदाईसाठी अत्याधुनिक ड्रील मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनद्वारा एका दिवसात एका खांबाची पायाखोदाई होऊ शकते. मात्र या मशीनचा वापर करण्यासाठी विद्युत वाहिन्या, टेलिफोन केबल हटविण्याची गरज असल्याची माहिती उड्डाणपूल कंत्राटदारांकडून उपलब्ध झाली आहे. यामुळे उड्डाणपुलाचे काम नागरी सुविधा स्थलांतर झाल्यानंतरच सुरू होणार आहे. यामुळे आता महापालिकेला नागरी सुविधा स्थलांतराचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. याबाबत महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांच्याकडे चौकशी केली असता लवकरच या मार्गावरील वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. या मार्गाने शहरात येणारी अवजड वाहने शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गाने वळविण्यात येणार आहेत. त्यानंतर नागरी सुविधा स्थलांतराचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

Related posts: