|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महापालिका, जि.प. निवडणूकीचा बिगुल वाजला

महापालिका, जि.प. निवडणूकीचा बिगुल वाजला 

21 फेब्रुवारी रोजी मतदान तर 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी,

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर महापालिका आणि जिल्हय़ाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखणाऱया सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. महापालिका आणि जिल्हा पररिषदेसाठी 21 फेबुवारी रोजी मतदान होणार असून 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमुळे शहरासह संपूर्ण जिल्हय़ात अचारसहिंता लागू झाली असून महापालिका आणि जि.प.च्या पदाधिकाऱयांनी आपले वहाने तात्काळ सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणूकांची घोषणा केली.सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक दुसऱया टप्प्यात होणार आहे. महापालिकेसाठी 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 4 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी, सात फेब्रुवारी रोजी अर्ज माघारी घेणे, आठ फेब्रुवारी रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप आणि याच दिवशी मतदान केंद्रनिहाय मतदार याची जाहीर करण्यात येणार आहे. तर 21 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 136 जागासाठी एक ते सहा फेब्रुवारी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करणे, सात फेब्रुवारी रोजी दाखल अर्जाची छाननी, 10 फेब्रुवारी अखेर जिल्हा न्यायाधिशांच्याकडे अपील, अपीलाचा संभाव्य निकाल 13 फेब्रुवारी, अपील नसल्यास माघार 13 फेब्रुवारी, अपील असल्यास माघार आणि मतदार यादी प्रसिध्द करणे 15 फेब्रुवारी, मतदान 21 फेब्रुवारी आणि मतमोजणी 23 फेब्रुवारी असा निवडणूकीचा कार्यक्रम आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर झाल्यापासून संबंधित भागात तात्काळ अचारसहिंता लागू केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी जिल्हय़ातील महापालिका आणि जिल्हा परिषदेसह वरिष्ठ अधिकाऱयांची तातडीने बैठक घेऊन अचारसहिंतेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दिल्या. तर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या पदाधिकाऱयांच्या ताब्यातील वहाने तात्काळ जमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या बहूतांशी पदाधिकाऱयांनी आपल्या ताब्यातील वहाने तात्काळ सोडून दिली असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे 68 मतदार संघ आहेत. यापैकी 39 मतदार संघ महिलांच्यासाठी राखीव आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 39 जागा राखीव असून यामध्ये 20 मतदार संघ महिलांच्यासाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी 10 जागा राखीव असून यामध्ये पाच मतदार संघ महिलांच्यासाठी राखीव आहेत. नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी 18 मतदार संघ राखीव असून नऊ मतदार संघ महिलांच्यासाठी राखीव आहेत. जिल्हा परिषदेतंर्गत जिल्हय़ात 11 पंचायती समिती असून या 11 पंचायत समितीचे 136 मतदार संघ आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण आहे. त्यामुळे महिलांच्यासाठी राखीव असलेल्या 39 मतदार संघात निवडणूकीची चांगलीच चुरस निर्माण होण्याचे संकेत आहेत.

सद्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. येथे सद्या राष्ट्रवादी काँग्रेस 35, काँग्रेस 19, आघाडी 10, शेकाप तीन आणि सेना एक असे पक्षीय बलाबल हेते. पण, गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अनेक ठिकाणी राजकीय समिकरणे बदलली आहेत. दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत अनपेक्षितपणे सेना भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या मिनी मंप्तालयावर झेंडा फडकविण्यासाठी गेल्या महिन्याभरापासूनच राजकीय पक्षांनी आपापल्या परिने परिश्रमाला प्रारंभ केला आहे. जिल्हा परिषदेची ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविली आहे. राष्ट्रवादीने सत्ताअबाधित राखण्यासाठी कंबर कसली असली तरी काँग्रेस, सेना आणि भाजपानेही सत्तापरिवर्तनासाठी जोरदार प्रयत्न चालविला आहे.

महापालिका निवडणूकीची रणधुमाळीही जोरदार रंगणार आहे. 26 प्रभागाच्या माध्यमातून 102 जागेसाठी ही निवडणूक होत आहे. सद्या महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. येथे काँग्रेस 44, राष्ट्रवादी 14, भाजप 26, सेना 10, बसपा तीन, माकप तीन, आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. पण, गेल्या पाच वर्षात शहरातीलही राजकीय समिकरणे बदलली आहेत. अनेक मान्यवरांनी या पक्षातून त्या पक्षात उडय़ा घेतल्या आहेत. काँग्रेसने येथे आपली सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजप, सेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तापरिवर्तनासाठी गेल्या दोन महिन्यापासून राजकीय हालचाली गतीमान केल्या आहेत.

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूकीचा बिगुल वाजला असल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी आणि पदाधिकाऱयांनी निवडणूक जाहीर होताच आपापल्या मतदार संघ आणि प्रभागात कार्यकर्त्याची जमावाजमव सुरू केली आहे.

Related posts: